प्रेमात आंधळा पुढाऱ्याचा मुलगा; वडिलांनाच पाच कोटींना खाईत घातले!

नांदेड (प्रतिनिधी):
प्रेम आंधळं असतं, असं म्हटलं जातं. पण या प्रेमानं नांदेडच्या एका प्रतिष्ठित पुढाऱ्यालाच चक्क पाच कोटींचा फटका बसल्याने शहरात चर्चेची झळ पोहोचली आहे.
सत्ताधारी पक्षातील प्रभावशाली नेत्याच्या मुलाने प्रेमाच्या जाळ्यात अडकून बापालाच फसवल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात जोरात रंगली आहे. जाती-पातीच्या अडथळ्यांवर मात करून लग्नासाठी मुलाने जी हट्टाची भूमिका घेतली, त्यातून निर्माण झालेल्या गोंधळामुळे पुढाऱ्याला पाच कोटी रुपयांची तडजोड करावी लागल्याचे समजते.
“५० खोके एकदम ओके” असा नारा देणाऱ्या पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या घरातील हे “५ कोटींचं प्रेमप्रकरण” सध्या शहरभर गाजत आहे. मुलाने लग्नाआधीच आपलं प्रेम सीमारेषेपलीकडे नेल्याने प्रकरण चिघळले. मुलीच्या घरच्यांनी संताप व्यक्त करत तडजोडीचा मार्ग स्वीकारावा लागला, आणि अखेर श्रीमंत बापाने आपल्या मुलाच्या प्रेमासाठी पाच कोटींचा सौदा मंजूर केल्याची माहिती समोर आली आहे.
या घटनेनंतर राजकीय आणि सामाजिक वर्तुळात कुजबुज सुरू झाली आहे — “राजकारणात आणि युद्धात सगळं माफ असतं, पण आता प्रेमातही तसंच का?”
दरम्यान, या प्रकरणाबाबत कोणतीही अधिकृत तक्रार नोंदवली नसली तरी काही मंडळी कायदेशीर कारवाईच्या तयारीत असल्याचे समजते.



