बाबळी व बळेगाव बंधारा बॅकवॉटर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विशेष आर्थिक पॅकेज द्या.
रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे यांची मागणी
दि.०९/०९/२४.
नांदेड जिल्ह्यातील मुख्य गोदावरी नदी वाहत असते ,या गोदावरी नदीवर बाभळी बंधारा व बळेगाव बंधारा आहे. बाबळी बंधारा व बळेगाव बंधारा बॅकवॉटर मुळे जिल्ह्यातील नायगाव ,उमरी, धर्माबाद ,बिलोली तालुक्यातील अनेक गावातील शेतीचे प्रचंड नुकसान दरवर्षी होत असते. त्यामुळे या गावातील शेतकऱ्यांना सरकारने तुटपुंजी मदत न करता कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करावी अशी मागणी रयत क्रांती संघटनेचे पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.
बाबळी बंधाऱ्यामुळे चिरली, कोंठा, गुजरी, कांगठी, खपराळा, कोळगाव इ.आणि बळेगाव बंधाऱ्याच्या बॅकवॉटरमुळे कुंटूर, सांगवी, इज्जतगाव, धनज, मेळगाव, सातेगाव, इकळीमाळ, बळेगाव, हुस्सा ,राहेर इ. गावातील शेतीचे प्रचंड नुकसान होते.
खरीप हंगामातील सोयाबीन, कापूस, मूग ,उडीद दरवर्षी पाण्याखाली जात असते ,त्यामुळे गेल्या अनेक वर्षापासून या भागातील शेतकऱ्याची प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे. सरकार दरवर्षी तुटपुंजी मदत जाहीर करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे काम करत असते .आमची संघटनेच्या वतीने माय-बाप सरकारला विनंती आहे ,या भागातील शेतकऱ्यांना कायमस्वरूपी उपाययोजना करत विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा करावी सरकारने जर या मागण्याची सकारात्मक दखल घेतली नाही, तर या भागातील शेतकऱ्याला घेऊन रयत क्रांती संघटना तीव्र आंदोलन करेल असा इशारा पांडुरंग शिंदे यांनी दिला.
यावेळी रयत क्रांती पक्षाचे उत्तम वडजे,हनुमंत नरवाडे, संतोष नरवाडे, दिगंबर नरवाडे, बालाजी हिवराळे, कैलास हिवराळे, भुजंग हिवराळे इ. शेतकरी उपस्थित होते.