राष्ट्रीय सेवा योजना साप्ताहिक श्रमदान शिबीर* *”स्वयंसेवकांचे राष्ट्र उभारणीत योगदान”: प्रा.डॉ .विनायक जाधव
मानवत / प्रतिनिधी.
मानवत दिनांक ६ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय सेवा योजना ( N .S .S . ) साप्ताहिक श्रमदान के.के.एम. महाविद्यालयाच्या परिसरात घेण्यात आले.
या श्रमदानासाठी मोठ्या संख्येने राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक उपस्थित होते या श्रमदान व उद्बोधन शिबिर प्रसंगी महाविद्यालयाचा परिसर स्वच्छ करण्यात आला त्यानंतर बौद्धिक सत्रात डॉ. विनायक जाधव यांनी “स्वयंसेवकांचे राष्ट्र उभारणीत योगदान” या विषयावर मार्गदर्शन केले .
या वेळी मार्गदर्शन करताना त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या उपक्रमातून व्यक्तिमत्व विकसित करण्यात मदत होते, समाजाप्रती सहकार्याची भावना , नाते समाजाची जोपासना , वृद्धाची काळजी व आदर, संस्कृती संवर्धन, पर्यावरण रक्षण व जनजागृती ,परिसर स्वच्छता ,श्रम प्रतिष्ठा या विविध समाजोपयोगी मूल्यांचा विकास होतो . त्यामुळे विद्यार्थ्यांनी अशा कार्यक्रमात प्रत्यक्ष सहभाग नोंदवून आपला व समाजाचा सर्वांगीण विकास करावा असे आवाहन त्यांनी या प्रसंगी केले .
यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा . एन . बी . गंडले यांनी भुषवले . यावेळी प्रा डॉ.लांडगे पी एस , प्रा. भागवत मोरे , प्रा .विनायक चोपडे, प्रा. डी .एन काळे प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रमाधिकारी प्रा. डॉ .एस .आर राठी यांनी केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ. सुभाष शिंदे ,प्रा.डॉ .श्रीमती . एस .जे. कुकडे (अनंतवाल)., डॉ. सत्यनारायण राठी प्रा .भागवत मोरे ., प्रा . खोब्रागडे , प्रा. श्रीमती घनवट मॅडम यांनी परिश्रम घेतले.
*