ताज्या घडामोडी

मोंढा परिसरातील मेनरोड वर गतीरोधक बसवा भाजपा विद्यार्थी आघाडीची मागणी.

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहर हे व्यापार पेठेचे शहर असून मानवत व्यापार पेठ दक्षिण – उत्तर असलेल्या मेन रोडच्या दोन्ही बाजूवर वसलेली आहे. तर शहरातून असणार्‍या मेन रोड वर शासकिय रूग्णालय, मोंढा, बॅका , शाळा, या मेनरोड च्या बाजूला आहे. मानवत शहर हे नगदी व्यापार पेठ असल्यामूळे मोठ्या प्रमाणात वाहणे भरून मोढ्यात व शहरात कृषि मालाची ने आण होते. त्यामूळे शहरातून मोठ्या प्रमाणात मालवाहतूक करणारे शेकडो वाहनाची वर्दळ असते शहरातून भरधाव धावणार्‍या वाहनामूळे अपघात होऊ नये म्हणून नगर परिषदेने नागरिकांच्या जिवित्वाची , व आरोग्याची काळजी घेऊन शासकिय रूग्णालय व जिल्हा परिषद शाळा व गटसाधन केंद्रा समोर मुख्य रस्ता असल्यामुळे या रस्त्याने मोठे अवजड वाहनांची ये-जा चालु असते त्यामुळे या ठिकाणी अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तर शाळेत जाणारे विद्यार्थी विद्यार्थीनी यांना सुध्दा रोज शाळेत सायकल अथवा पायी जावे लागत असल्यामुळे व जेष्ठ नागरीक गुरे ढोरे, जनावरे यांचे जिवित्वास धोका निर्माण होण्याची शक्यता निर्माण होत आहे.
त्यामुळे मानवत नगर परिषदेच्या मूख्याधिकारी श्रीमती कोमल सावरे यांनी नागरिकांच्या जिवित्वाची खबदारी घेऊन वरील गोष्टीची दखल घेऊन व होणारी जीवीत हानी टाळण्यासाठी सदरील मेन रोडवर गतीरोधक बसवावा अशी मागणी भाजपा विद्यार्थी आघाडीच्या वतीने शहराध्यक्ष नंदकूमार कच्छवे यांनी भाजपाच्या प्रसिध्दी पत्रकाद्वारे मानवत नगर परिषदेचे मूख्याधिकारी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनावर भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.