ताज्या घडामोडी

मानवत येथे जमियते उलेमा-ए-हिंद (अर्शद मदनी) यांची कार्यकारणीची बैठक संपन्न

मानवत / प्रतिनिधी.

मानवत शहरातील जामा मस्जिद येथे जमियते उलेमा-ए-हिंद (अर्शद मदनी) यांची कार्यकारणी बैठक दि. 8 सप्टेंबर रविवार रोजी संपन्न झाली. बैठकीत दोन कमिटी ची स्थापन करण्यात आली. या बैठकी मध्ये खारी अब्दुल रशीद साहाब यांची मुख्य उपस्थिती होती.
या बैठकीत मानवत तालुका कमिटी मध्ये जामा मस्जिद मानवत चे इमाम मौलाना इम्रान खान नदवी यांना तालुका अध्यक्ष, अयुब बागवान मिलन यांना सचिव, शेख हारुण यांना उपसचिव, मनसब खान यांना कोषाध्यक्ष, जुनेद कुरेशी व हाफेज अस्लम यांना उपाध्यक्ष पद देण्यात आले. मानवत शहर कमिटी मध्दे हाफेज एजास बागवान यांना शहर अध्यक्ष, सय्यद मुजीब यांना उपशहर अध्यक्ष, रशीद बागवान यांना सचिव, आरेफ कुरेशी यांना उपसचिव, पद देण्यात आले. या बैठकी मध्ये जमियते उलेमा-ए-हिंद (अर्शद मदनी) चे सर्व पद अधिकारी व शहरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.