ताज्या घडामोडी

आता निःस्वार्थपणे काम करणे जीवनाचा भाग बनविला! भास्करराव पा. खतगावकर

नांदेड प्रतिनिधी: दि 16 सप्टेंबर
मी खासदार, आमदार, मंत्री म्हणून काम केलोय. आता निःस्वार्थपणे काम करणे हा माझ्या जीवनाचा भाग बनविला असे प्रतिपादन माजी मंत्री तथा खा. भास्करराव पाटील खतगावकर यांनी केले ते ‘द टॉयमॉल प्रतिष्ठाण कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलत होते. यावेळी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर, नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्ष राजेश पावडे, सायन्स महावि‌द्यालयाचे प्राचार्य लक्ष्मणराव शिंदे खंडेराव वने, सुरेश हटकर, सतपाल सावंत, बाबुराव कावळे, नामदेवराव फुलपगार, माधव जमदाडे, डॉ. एस.एस. जाधव यांची उपस्थिती होती.

खतगावकर पुढे म्हणाले की, 35 वर्षापूर्वी माझा मुलगा लहान होता त्याने आग्रह धरला की, मला फोर व्हिलर (खेळणी) हवी. मुंबईत खेळणीसाठी आम्ही खूप फिरलो. आई- वडील स्वतःपेक्षा मुलांच्या उत्कर्ष व आनंदासाठी सढळ खर्च करतो. यावेळी सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी व्यवसाय आणि नोकरी यांच्या संधी यावर प्रकाश टाकला. याप्रसंगी राजेश पावडे यांचे समायोचित भाषण झाले. विद्यमान आमदार श्री बालाजीराव कल्याणकर यांनी कार्यक्रमास वेळेपूर्वी सदिच्छा भेट दिली आणि शुभेच्छा व्यक्त केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व नेटके सूत्रसंचलन निवृत्त अभियंता साहेबराव जाधव यांनी केले. यावेळी अंकुश जाधव, शुभम जाधव, शोभा जाधव, मनिषा जाधव, वर्षा जाधव, बळीराम जाधव, लक्ष्मण जाधव, पवन थोरात, तनिष्का धडके इ. यांनी विशेष परिश्रम घेतले.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.