ताज्या घडामोडी

सकल मुस्लिम समाजाच्या वतीने* नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांना विविध मागण्याचे निवेदन

मानवत / प्रतिनिधी.

मानवत तालूक्यातील ताडबोरगाव येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने नवनिर्वाचित आमदार राजेश दादा विटेकर यांना यांना मुस्लिम समाजाच्या विविध मागण्याचे निवेदन *सकल मूस्लिम* समाजाच्या वतीने देण्यात आले.
सविस्तर वृत्त असे की, अजित दादा पवार राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे नवनिर्वाचीत विधान परिषद आमदार मा. राजेश दादा विटेकर हे मानवत तालूक्यातील ताडबोरगाव येथे १५ सप्टेंबर रोजी आले असता त्या प्रसंगी ताडबोरगाव येथील सकल मुस्लिम समाजाच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.
या वेळी दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली की मुस्लिम समाजाला आरक्षणाच्या मागणी बाबत विधान परिषद मध्ये आरक्षणाची मागणी करावी तसेच मुस्लिम समाजाचे विविध प्रलंबित प्रश्न विधान परिषदेत मांडून न्याय द्यावा अशी मागणी *सकल मुस्लिम* समाजाचे वतीने देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली.
यावेळी सकल मुस्लिम समाजाचे यकिन खान, सोहेब खान , जफर खान , आरबाज खान, मुस्ताफा खान , सलमान खान , साहेद खान , आदीसह *सकल मूस्लिम* समाजाचे कार्यकर्ते व पदाधिकारी या वेळी मोठ्या संख्याने उपस्थित होते.

***

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.