ताज्या घडामोडी

मराठवाडा मुक्ती संग्राम

कहाणी मराठवाडा मुक्ती संग्रामाची*💐💐💐💐
मराठवाड्यातील सर्व जनतेला 77 व्या मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा! आज 77 वा मराठवाडा मुक्ती संग्राम दिन असून मराठवाड्यातील प्रत्येक सरकारी कार्यालय,शाळा, महाविद्यालय, निमसरकारी संस्था ग्रामपंचायत सर्वच ठिकाणी मोठ्या थाटामाटात हा दिवस साजरा केला जातो. दुर्दैवाची बाब मराठवाडा स्वातंत्र्यदिनानिमित्त आपले विचार मात्र काहीच जण व्यक्त करतात कारण त्यांना या दिनाची परिपूर्ण माहिती नसते. मराठवाड्यातील प्रत्येक व्यक्तीला मराठवाडा स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती व्हावी व प्रत्येकाला मराठवाड्याविषयी अभिमान वाटावा या हेतूने कहानी *मराठवाडा मुक्ती संग्रामाची* हा लेख आपणास समोर प्रस्तुत करत आहे.
मुघल बादशहा औरंगजेब सत्ता विस्तारासाठी महाराष्ट्रात आला होता परंतु मराठ्यांच्या आक्रमक वृत्ती पुढे त्याचा व त्याच्या सैन्याचा निभाव लागला नाही शेवटी इसवी सन 1707 मध्ये त्याचा अहमदनगर येथे मृत्यू झाला. निजाम हे दक्षिण भारतातील मुघलांचे सुभेदार होते. मुघलांनी त्यांना निजाम ही पदवी दिलेली होती. इसवी सन 1724 रोजी निजाम उल मुल्क उर्फ मीर कम्रुद्दीन यांनी हैदराबाद येथे निजाम किंवा आसबजाही घराण्याची स्थापना करत मुघलांची सुभेदारी डावललि व आपणच हैदराबाद संस्थानाचे बादशाह आहोत अशी घोषणा केली. पहिला निजाम म्हणून मीर कमृद्दीन यांनी राज्यकारभार हाती घेतला. हैदराबाद हे स्वतंत्र संस्थान निर्माण करून दक्षिण भारतातील सर्वात मोठे संस्थान बनविले. या हैदराबाद संस्थानात आजचे आंध्र प्रदेश तेलंगणा कर्नाटक व महाराष्ट्रातील मराठवाड्याचा भूभाग असा विस्तीर्ण साम्राज्य विस्तार निजामांनी केला.
मीर कम्रुद्दीन उर्फ निजाम मुल्क या पहिल्या निजामाने इसवी सन 1724 ते 1748 या काळात हैदराबाद संस्थानाला आर्थिक व लष्करी दृष्ट्या परिपक्व बनवले.
त्यानंतर इसवीसन 1748 ते 1750 या काळात मी नाशिर जंग दुसरा निजाम सत्तेवर आला परंतु आपल्या संस्थानातील एका गटांनी केलेले हल्ल्यात तो मारला गेला. इसवी सन 1750 ते 1751 या एका वर्षाच्या काळात मीर मुजफ्फर जंग सत्तेवर आला त्याने फ्रेंच व मुघलांची मदत मिळवली. इसवी सन 1751 ते 1762 या कालावधीसाठी मीर सलाबाद जंग चौथा निजाम बनला त्याच्या काळात ब्रिटिशांनी हैदराबाद संस्थानावर सतत आक्रमणे केली. इसवीसन 1762 1803 या काळात मीर अली खान पाचवा निजाम बनला त्याने ब्रिटिशांची मदत मिळवत हैदराबाद संस्थानात अनेक विकास कामे केली तसेच हैदराबादला एक महत्त्वाचे व्यापारी केंद्र बनवले. इसवी सन 1803 ते 1829 या काळात सहावा निजाम म्हणून मीर अकबर अली खान सत्तेवर आले त्यांनीही ब्रिटिशांशी मित्रत्वाचे संबंध प्रस्थापित करत हैदराबाद संस्थानांमध्ये सामाजिक सुधारणा व अनेक विकास कामे केली.
इसवीसन 1829 ते 1857 या काळात मीर फतेह अली खान सातवा निजाम सत्तेवर आले त्यांनी संस्थानांमध्ये आर्थिक आणि प्रशासकीय सुधारणा केल्या तसेच शिक्षण आणि आरोग्य क्षेत्रात विशेष योगदान दिले.
इसवी सन 1857 ते 1869 या काळात मीर अफजल उददोला आठवा निजाम सत्तेवर आला या काळात संपूर्ण भारतात इंग्रजांविरोधी 1857 चे स्वातंत्र्य युद्ध चालू होते याने मात्र 1857 चा भारतीयांचा उठाव दडपून टाकण्यासाठी इंग्रजांना मदत केली तसेच सिंचन व पायाभूत सुविधा केल्या.
1869 ते 1911 या काळात मीर महेबुब अली खान हा नववा निजाम सत्तेवर आला याच्या काळात हैदराबाद संस्थानात शिक्षण आरोग्य सेवा प्रशासकीय कार्यालय या क्षेत्रात सुधारणा झाल्याने संस्थानाची आर्थिक स्थिती भक्कम झाली.
इसवी सन 1911 ते 1948 या काळात दहावा व शेवटचा निजाम म्हणून मीर उस्मान अली खान सत्तेवर आला
याच्या काळात हैदराबाद संस्थान अत्यंत श्रीमंत आणि शक्तिशाली बन ले मीर उस्मान अली खान हा त्या काळात आशिया खंडात सर्वात श्रीमंत राजा बनला. याच्याच काळात उस्मानिया विद्यापीठाची स्थापना करण्यात आली. आज उस्मानिया विद्यापीठ भारतातील महत्त्वाच्या विद्यापीठांमध्ये ओळखले जाते. मीर उस्मान अली खान याची कारकीर्द वादग्रस्त मानली जाते कारण या काळात संस्थानातील इस्लाम धर्माखेरीज इतर धर्माची गळचेपी होऊ लागली सक्तीचे धर्मांतरण लादले जाऊ लागले, गोरगरिबांना अनेक धार्मिक संकटांचा सामना करावा लागत असे.
मीर उस्मान अली खान यांनी काशिम रजवी यांच्या माध्यमातून अन्याय अशी *रझाकार संघटना* स्थापन केली व ही संघटना संस्थानांमध्ये धार्मिक दंगली निजामाच्या आदेशावरून घडून आणत असे अशा परिस्थितीत मराठवाड्यात महाराष्ट्र स्टेट काँग्रेस ची स्थापना झाली. या महाराष्ट्र स्टेट काँग्रेसच्या माध्यमातून स्वामी रामानंद तीर्थ यांनी निरपराध जनतेवर होणाऱ्या अन्याय विरोधात आवाज उठविला. स्वामीजींनी अनेक तरुणांना सोबत घेत प्रभावी व्याख्याने, चर्चासत्रे घडवून आणत लोकांमध्ये जागृती निर्माण केली. मराठवाडा मुक्ती संग्रामात स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान अद्वितीय होते त्यांनी शाळा महाविद्यालयात जाऊन निजामाच्या अन्याय व जुलमी धोरणाचा तिरस्कार करत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये जागृती निर्माण केली. इसवी सन 1938 मध्ये स्वामीजींनी हैदराबाद स्टेट काँग्रेस ची स्थापना केली व त्या अंतर्गत लोकांना स्वातंत्र्याच्या लढ्यात सामील करून घेत लोकजागृती केली. संपूर्ण हैदराबाद संस्थानांमध्ये गांधीवादी विचारांचे पालन करून अहिंसक मार्गाने आंदोलने चालवली. शेवटी 1947 -48 मध्ये त्यांनी मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आणि सामान्य लोकांना निजामाच्या जुलमी राजवटीविरुद्ध उभे केले.
इसवी सन 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश ब्रिटिशांच्या अन्यायी जोखडातून स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याचा आनंद संपूर्ण भारतीय घेत असताना मराठवाड्यातील जनतेला जणू सुतकच पडले होते कारण मराठवाडा हैदराबाद संस्थानात असल्याने तो आणखीन मुक्त झाला नव्हता. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू व गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी हैदराबाद संस्थानातील लोक मताचा विचार करत भारतात सामील होण्यासाठी निजामाकडे सामील नामा पाठवला पण निजाम भारतात सामील व्हायला तयार नव्हता तेव्हा भारताचे गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी निजामाचा पाडाव करण्यासाठी भारतीय फौजेचा आधार घेण्याचे ठरविले. भारतीय फौजेने निजामाचा पराभव करण्यासाठी *ऑपरेशन पोलो* या सांकेतिक नावाची मोहीम आखली व 13 सप्टेंबर 1948 रोजी कर्नाटक,महाराष्ट्र,मध्य प्रदेश मार्गे हैदराबाद संस्थानात प्रवेश केला. भारतीय सैन्याच्या आक्रमक लढा पुढे चारच दिवसात निजाम शरण आला व 224 वर्षांची गुलामी सोसलेला मराठवाडा इसवी सन 17 सप्टेंबर 1948 रोजी स्वतंत्र झाला. स्वातंत्र्याची पहाट उजाडली व संपूर्ण मराठवाड्यात आनंद उत्सवात पहिल्या मराठवाडा मुक्ती दिनानिमित्त स्वातंत्र्याचा तिरंगा फडकविण्यात आला.
. आपलाच
. प्रा. दिगंबर किशनराव
. गडगिळे
. ( विभाग प्रमुख :-
. जिजाऊ ज्ञानतीर्थ
. NEET/JEE
. foundation मानवत
. रोड)

**

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.