ताज्या घडामोडी

आज माझी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या निवासस्थानी ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या हस्ते गणरायाची पूजा

नांदेड प्रतिनिधी:      आज माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या साई-सुभाष, वसंतनगर, नांदेड येथील निवासस्थानी राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री मा.ना.श्री.गिरीश महाजन साहेब व राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा राज्यसभा खासदार मा.श्री.अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते श्री गणरायाची पूजा करून आरती करण्यात आली.

यावेळी राज्यसभा खासदार डॉ.अजित गोपछडे, आमदार भीमराव केराम, आमदार बालाजीराव कल्याणकर, माजी आमदार अमरनाथ राजुरकर, माजी आमदार सुभाषराव साबणे, माजी आमदार राम पाटील रातोळीकर, विशेष पोलीस महानिरीक्षक शहाजी उमाप, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत अप्पर जिल्हाधिकारी पांडुरंग बोरगावकर, महानगरपालिका आयुक्त महेशकुमार डोईफोडे, पोलीस अधीक्षक अविनाश कुमार, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे, भारतीय जनता पार्टी प्रदेश सचिव देविदास राठोड, हिंगोली लोकसभा प्रमुख रामदास पाटील सोमठाणकर, भारतीय जनता पार्टी ग्रामीण जिल्हाध्यक्ष डॉक्टर संतुकराव हंबर्डे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष एडवोकेट किशोर देशमुख, भारतीय जनता पार्टी प्रदेश कार्यकारी सदस्य चैतन्यबापू देशमुख, धर्मराज देशमुख, बालाजीराव बच्चेवार, बाळू खोमणे, जनार्दन ठाकूर, अरविंद भारतीया, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महानगर अध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.