ताज्या घडामोडी

करिअर कट्टा अंतर्गत आवाज गुरुजनांचा कार्यशाळेचे आयोजन

नांदेड(प्रतिनिधी): महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र आणि IQAC यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने “करियर कट्टा” आणि FDP या उपक्रमांतर्गत
‘आवाज गुरुजनांचा – वेध देशाच्या भवितव्याचा’ या आवाजाची कार्यशाळेचे आयोजन दिनांक 18 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 12:00 वाजता यशवंत महाविद्यालयात करण्यात आले आहे. प्रसिद्ध आवाजतज्ञ सोनाली लोहार मुंबई, यांचे या कार्यशाळेस मार्गदर्शन लाभणार आहे. या कार्यशाळेचे उद्घाटक म्हणून प्रो.डॉ. मनोहर चासकर कुलगुरू स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड यांची उपस्थिती लाभणार आहे.कार्यशाळेचे आयोजन महाविद्यालयाच्या इंग्रजी भाषा प्रयोगशाळा येथे करण्यात आलेले आहे. कार्यशाळेस उपस्थित राहावे असे आवाहन प्राचार्य तथा स्वामी रामानंद मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू डॉ. गणेशचंद्र शिंदे, डॉ. मूठठे पी. आर. जिल्हा समन्वयक डॉ. पंजाब चव्हाण प्राचार्य प्रवर्तक डॉ. सतिश चव्हाण समन्वयक करिअर कट्टा
यांनी केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.