यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाचा सत्रारंभ कार्यक्रम संपन्न

नांदेड: दिनांक( 22 ऑगस्ट 2023 )यशवंत महाविद्यालयातील अर्थशास्त्र विभागाच्या वतीने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्रकुलगुरु तथा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर गणेशचंद्र शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी व पदवीत्तर प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सत्रारंभ कार्यक्रम कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख व्याख्याते म्हणून प् जयवंतराव पाटील महाविद्यालय हिमायतनगर, अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ.दत्ता मगर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी “वित्तीय साक्षरता व अर्थशास्त्र विषयातील करिअरच्या संधी” या विषयावर संत्रारंभ कार्यक्रमानिमित्त विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. पी. आर. मुठे अर्थशास्त्र विभाग प्रमुख यशवंत महाविद्यालय नांदेड हे होते तर प्रा. डॉ. ज्ञानेश्वर पपुलवाड प्रा. डॉ. डी डी भोसले यांची मंचावर उपस्थिती होती. प्रमुख पाहुण्याचा परिचय प्रा. डॉ. डी डी भोसले यांनी अगदी समर्पक शब्दात विद्यार्थ्यांना करून दिला. कार्यक्रमाच्या प्रारंभी अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी आर मुठे यांनी प्रमुख पाहुण्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना अर्थशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. पी. आर. मूठे म्हणाले की विद्यार्थ्यांनी आपले भविष्य घडविण्यासाठी या महाविद्यालयात प्रवेश घेतला आहे, त्या विद्यार्थ्यांना महाविद्यालयात असलेल्या सोयी सुविधा काय आहेत याची माहिती असावी, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रम शिकताना त्यामध्ये करिअरच्या काय संधी आहेत याची माहिती व्हावी, महाविद्यालयात कोणकोणते कार्यक्रम राबवले जातात याची माहिती मिळावी,
तसेच अर्थशास्त्र विभागाकडून कोणकोणते कार्यक्रम घेतले जातात याची जाण असावी, याबद्दल माहिती करून देण्यासाठी सत्रारंभ कार्यक्रम आयोजित करण्यात येत असल्याची माहिती देण्यात आली. विशेष म्हणजे महाविद्यालयात ऑनलाईन पद्धतीने ज्या गोष्टी घेतल्या जातात जसे की ऑनलाईन हजेरी ऑनलाईन विषय संबंधित नोट्स ऑनलाईन परीक्षा व्हिडिओ लिंक या बाबीसाठी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांने तयार केलेले सॉफ्टवेअर असून या सर्व गोष्टीची माहिती व्हावी. असे त्यांनी प्रास्ताविक पर मनोगत व्यक्त करताना विद्यार्थ्यांना माहिती दिली. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे प्रा. डॉ. दत्ता मगर आपल्या व्याख्यानात म्हणाले की अर्थशास्त्र विषयात करिअरच्या संधीचा विचार केला तर अर्थशास्त्र हे प्रत्येक वेळी व प्रत्येक ठिकाणी उपयोगी पडणारे शास्त्र असून बँकिंग क्षेत्र शेअर मार्केट स्पर्धा परीक्षा एवढेच नव्हे तर देशाचे अर्थतज्ञ म्हणून सुद्धा या क्षेत्रात प्रगती करून आपण देश विदेशात आपला नावलौकिक मिळू शकतो. वित्तीय साक्षरते संबंधित बोलताना ते म्हणाले की आधुनिक काळात आपण वित्तीय साक्षरतेला महत्त्व दिले पाहिजे कारण इतर देशापेक्षा आपण वित्तीय साक्षरते इतरांच्या तुलनेने कमी असल्यामुळे शेअर मार्केट भांडवली बाजार नाणे बाजार या क्षेत्रात देशातील कमी लोक गुंतवणूक करतात म्हणून लोकांनी वित्तीय साक्षर होऊन भांडवल बाजार व नाणे बाजारात गुंतवणूक वाढवून आपली प्रगती करावी. यासाठी वित्तीय साक्षर असणे महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना त्यांनी शेअर मार्केट म्हणजे काय, भांडवली बाजार म्हणजे काय, नाणेबाजार म्हणजे काय, तसेच शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे इत्यादी बद्दल सविस्तर मार्गदर्शन केले विद्यार्थ्यांचे ज्ञान हेच भांडवल असून त्यांनी ज्ञानरूपी भांडवलात वाढ केली तर आपोआपच ते मोठे होतील असे यावेळी ते म्हणाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ.संतोष पाटील यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा. डॉ. शिवराज आवाळे यांनी केले. सत्रारंभ कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अर्थशास्त्र विभागातील प्रा. डॉ. प्रवीणकुमार सेलूकर प्रा. डॉ. शिवराज आवाळे प्रा डॉ. योगिता पवार प्रा राहुल लिंगमपल्ले, प्रा. डॉ. संतोष पाटील प्रा. डॉ प्रीती नाईक प्रा.नयना देशमुख तसेच विद्यार्थ्यांनी परिश्रम घेतले