यशवंत ‘ चे युवक महोत्सवात सुयश
नांदेड:(दि.२४ऑक्टोबर २०२४)
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठस्तरीय युवक महोत्सव सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन येथे दि. १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान संपन्न झाला.
या युवक महोत्सवात यशवंत महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी विविध स्पर्धेत सहभाग नोंदवला. त्यापैकी भारतीय सुगम गायन स्पर्धेत कु. माधवी मठपती हिने दुसरा क्रमांक, कु. रुद्रानी मोरे हिने शास्त्रीय नृत्य या प्रकारात तिसरा क्रमांक पटकाविला तर पोवाडा या गीत प्रकारात महाविद्यालयाला दुसरे सांघिक पारितोषिक मिळाले.
पोवाडा या गीत प्रकारात विश्वनाथ माटाळकर, प्रज्योत कांबळे, रोहन वेडे, मंगेश भालेराव, वैभव कदम, उदय जाधव, दुर्गा जगदंबे, विनेश्री गडगिळे, अंकिता भारती यांनी सहभाग घेतला.
सर्व स्पर्धकांना सांस्कृतिक विभाग समन्वयक प्रा.संगीता चाटी आणि संगीत विभागप्रमुख डॉ. शिवदास शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.
या सुयशाबद्दल यशस्वीतांचे श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारणी सदस्य आणि विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य श्री.नरेंद्र चव्हाण, माजी प्र- कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ. हरिश्चंद्र पतंगे, संगीत विभागप्रमुख डॉ.शिवदास शिंदे, सांस्कृतिक विभाग समन्वयिका प्रा.संगीता चाटी, सदस्य डॉ.शबाना दुर्राणी, डॉ. संदीप पाईकराव, डॉ.विश्वाधार देशमुख, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, संगीत विभाग शिक्षकेतर कर्मचारी श्री.ठाकूर यांनी अभिनंदन केले आहे.