ताज्या घडामोडी
सी.ए.परीक्षेत नांदेड चा केदार येरावार देशात 38वा

नांदेड: सी. ए. परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला.भारतातील कठीण समजल्या जाणाऱ्या परीक्षेपैकी ही एक परीक्षा आहे.नांदेडच्या केदारने स्वतःची मोहर या निकालांमध्ये उमटवली आहे.केदारच्या यशाची आणि प्रेरणादायी प्रवासाची ही कथा खरोखरच अभिमानास्पद आहे. लहानपणी वडिलांचे छत्र हरवले. आई आणि आजोबांच्या पाठिंब्याने त्याने जीवनात हे यश मिळवले आहे.केदारने सी.ए. इंटर परीक्षेत भारतातून ४३ वा आणि सी.ए.फायनल परीक्षेत ३८ वा क्रमांक मिळवला आहे. निरुपणकार म्हणून त्यांची ओळख आहे.सी. ए. सारख्या कठीण परीक्षेत देशपातळीवर यश मिळविणे अभिमानास्पद बाब आहे.या यशाबद्दल सर्वांनी त्यांचे अभिनंदन केल आहे.