विद्यापीठस्तरीय आविष्कार स्पर्धेत ‘यशवंत ‘ चे सुयश
नांदेड:(दि.२३ ऑक्टोबर २०२४)
श्री.शिवाजी महाविद्यालय, परभणी येथे दि. २१ आणि २२ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठस्तरीय आविष्कार संशोधन स्पर्धेत यशवंत महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना सुयश प्राप्त झाले आहे.
या संघाचे नेतृत्व वाणिज्य विभागातील प्रा.भारती सुवर्णकार यांनी केले.
एम.कॉम.प्रथम वर्षाचा विद्यार्थी तेजस पवार याने उपप्राचार्य आणि वाणिज्य विभागप्रमुख डॉ.एच.एस.पतंगे यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान श्रेणीत प्रथम पारितोषिक पटकावले आहे.
किरपालसिंग तवाना या बी.कॉम. प्रथम वर्षाच्या विद्यार्थ्याने प्रा.भारती सुवर्णकार यांच्या मार्गदर्शनाखाली पदवी वाणिज्य आणि व्यवस्थापन व लॉ स्पर्धेत द्वितीय पारितोषिक प्राप्त केले आहे.
एम.कॉम.प्रथम वर्षाची विद्यार्थिनी नेहा पवार हिने डॉ.आर.एल.सोनटक्के यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर वाणिज्य आणि व्यवस्थापन व लॉ स्पर्धेत तृतीय पारितोषिक प्रदान करण्यात आले आहे.
यशस्वी विद्यार्थ्यांचे श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष माजी मुख्यमंत्री खा.अशोकरावजी चव्हाण, माजी प्र-कुलगुरु तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ.एल.व्ही. पदमारानी राव, प्रा.कैलास दाड, नांदेड जिल्हा आविष्कार समन्वयक डॉ.एम.एम.व्ही.बेग, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे यांनी अभिनंदन केले आहे.
विद्यार्थ्यांच्या संशोधन क्षेत्रातील या उत्कृष्ट कामगिरीमुळे यशवंत महाविद्यालयाची शैक्षणिक उत्कृष्टता आणि समर्पित मार्गदर्शन सिद्ध झाली आहे.