यशवंत ‘ मधील प्रा.ओ.एन.गुंजकर आणि डॉ.एस.एस.बोडके यांचे राष्ट्रीय स्तरावर सुयश
नांदेड:( दि.२५ ऑक्टोबर २०२४)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील प्रा.ओमप्रकाश नागनाथराव गुंजकर आणि डॉ.श्रीरंग सटवाजी बोडके यांनी वेटनर्स क्रीडा असोसिएशन, नाशिकतर्फे आयोजित तिसऱ्या राष्ट्रीय वेटनर्स क्रीडा चॅम्पियनशिप, ‘खेल महाकुंभ’ दि.२३ ऑक्टोबर रोजी संपन्न झालेल्या जलतरण स्पर्धेत लक्षणीय सुयश प्राप्त केले आहे.
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील समाजशास्त्र विभागातील प्रा.ओमप्रकाश गुंजकर यांना ५० मीटर फ्रीस्टाइल जलतरण स्पर्धेत सुवर्ण, ५० मीटर्स बॅकस्ट्रोक स्पर्धेत रजत आणि १०० मीटर बॅकस्ट्रोक स्पर्धेत रजत पदक प्राप्त झाले आहे तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील वनस्पतीशास्त्र विभागप्रमुख डॉ.श्रीरंग बोडके यांना १०० मीटर्स फ्रीस्टाइल स्पर्धेत कांस्यपदक प्राप्त झाले आहे.
राष्ट्रीय स्तरावरील या सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू तथा विद्यमान प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे तथा डॉ.हरिश्चंद्र पतंगे,यांनी अभिनंदन केले आहे.