ताज्या घडामोडी
भगवान रजनीश एकदिवसीय ध्यान शिबिर नाळेश्वर येथे उत्साहात संपन्न
नांदेड:( दि.२७ ऑक्टोबर २०२४)
भगवान रजनीश ब्लेसिंग्ज मेडिटेशन इंटरनॅशनल कम्युनचे एकदिवसीय ध्यान शिबिर नाळेश्वर येथे उत्साहात संपन्न झाले.
या शिबिरात लिसनिंग मेडिटेशन, नृत्य ध्यान, जिब्रिश, सायलेंट सीटिंग इत्यादी ध्यान प्रकारांचा लाभ साधक आणि भगवान रजनीश संन्यासी व प्रेमींनी घेतला.
नाळेश्वर येथील तुलसी पेंट्सचे ओनर श्री. सुरेश धूत यांच्या फार्म हाऊसवर हे शिबिर विविध ध्यान प्रयोगांनी उत्साहात संपन्न झाले. शिबिराचे संचालन श्री.सुरेश धूत यांनी केले.
शिबिरात माजी उपमहापौर प्रा.सुनील नेरळकर, श्री.सुभाष फाळके, यशवंत महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, सरोज पनाड, अमृता मुखेडकर, भागवत कापसे, सुभाष गादेवार, श्री.टेकाळे यांनी सक्रिय सहभाग घेतला.