ताज्या घडामोडी

यशवंत ‘मधील डॉ.विक्रम देशमुख यांचे आंतरराष्ट्रीय परिषदेत योगदान

नांदेड:( दि.२४ ऑक्टोबर २०२४)
यशवंत कनिष्ठ महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागातील डॉ.विक्रम देशमुख यांनी नेदरलॅण्ड्समधील अँमस्टरडॅम येथील परिषदेमध्ये शोधनिबंध सादर केला असून युरोपियन काँग्रेसमार्फत आयोजित ‘संसर्गजन्य रोग’ या परिषदेमध्ये सत्राध्यक्ष व बीजभाषक म्हणून महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
डॉ.विक्रम देशमुख हे हदगाव तालुक्यातील इरापूर येथील मूळ रहिवासी आहेत. नेदरलँडस् येथे युरोपियन काँग्रेसमार्फत अमस्टरडॅम येथे संसर्गजन्य रोग या आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेमध्ये डॉ. विक्रम देशमुख यांनी विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या. परिषदेमध्ये त्यांनी सत्राध्यक्ष होण्याबरोबरच बीजभाषक म्हणून सुद्धा कार्य पार पाडले. शिवाय व्यवस्थापकीय सदस्य म्हणूनदेखील कार्य पार पाडले. संसर्गजन्य रोग यावर त्यांनी आपला शोधनिबंध सादर केला. त्याबद्दल त्यांना नेदरलँडच्या युरोपियन काँग्रेसकडून सन्मानित करण्यात आले. साता समुद्रापलीकडे जाऊन नांदेडच्या या प्राध्यापकाने संसर्गजन्य रोगासंदर्भात दिलेले योगदान नेदरलँड येथे विशेष गाजले. त्यामुळे त्यांचा यथोचित सन्मान युरोपियन काँग्रेसमार्फत करण्यात आला.
या योगदान आणि सुयशाबद्दल माजी प्र-कुलगुरू व विद्यमान प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे व डॉ.कविता सोनकांबळे, मार्गदर्शक डॉ. संजय ननवरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.के. आर.रबडे, पर्यवेक्षक सौ.व्ही.सी. बदने, प्रा.मंगेश शिंदे, प्रा.श्रीकांत सोमठाणकर, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे आणि सर्व सहकारी मित्र व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.

Chief Editor

SHARE

Related Articles

Leave a Reply

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.