एम सी आर
Uncategorized

नांदेडमध्ये ‘हरित नांदेड’ अभियानांतर्गत 1000 महावृक्षांची लागवड 600 वृक्षांचे घनवन, तर 400 मोठ्या वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प

नांदेडमध्ये ‘हरित नांदेड’ अभियानांतर्गत 1000 महावृक्षांची लागवड

600 वृक्षांचे घनवन, तर 400 मोठ्या वृक्षांची लागवड; पर्यावरण संवर्धनाचा सामूहिक संकल्प

नांदेड : पर्यावरण संरक्षणासह नांदेड शहर अधिक हिरवेगार व पर्यावरणपूरक करण्याच्या उद्देशाने CREDAI Nanded आणि Lions Club of Nanded Pride यांच्या संयुक्त विद्यमाने ‘हरित नांदेड अभियान 2026’ अंतर्गत 1000 महावृक्ष लागवडीचा उपक्रम रविवारी उत्साहात पार पडला.
नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका, गुरुद्वारा लंगर साहिब आणि वृक्षमित्र फाऊंडेशन यांच्या सहकार्याने तरोडा बु. येथील श्री. अभिजीत रेणापुरकर यांच्या RK Builders & Developersच्या लेआउटमधील ओपन स्पेसमध्ये हा उपक्रम राबविण्यात आला.या उपक्रमांतर्गत 600 वृक्षांची घनवन पद्धतीने लागवड, तर 400 मोठ्या वृक्षांची लागवड करण्यात आली. कमी क्षेत्रात अधिकाधिक वृक्षांची लागवड करून शहरातील हरित क्षेत्र वाढविण्याच्या उद्देशाने घनवन पद्धतीचा अवलंब करण्यात आला.कार्यक्रमाला नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे सभागृह नेते मा. श्री. महेश कनकदंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी Lions Club Nanded Prideचे सदस्य लायन परिष कसलीवाल, हरीश लालवानी, अनुज बियाणी, योगेश मोगडपल्ली, ऋषिकेश नेरळकर, मोहन देशमुख, अभिजीत रेणापुरकर, परेश मुनोत, मयूर अग्रवाल, डॉ. राजेश दगडिया, कृष्णा दमकोंडवार, विशाल कंदकुर्ते, ओम रुईकर, अर्जुन जाधव, आशिष पाटणी, ईश्वर बंग, गणेश मुदहोळकर, चौधरी, चैतन्य कुलकर्णी आदी सदस्य सहकुटुंब उपस्थित होते.
उपस्थित मान्यवर व नागरिकांनी वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला. ‘एक झाड – पुढच्या पिढीसाठी’ या संकल्पनेतून राबविण्यात आलेला हा उपक्रम केवळ वृक्षलागवडीपुरता मर्यादित न राहता, लागवड केलेल्या वृक्षांच्या संवर्धनाची जबाबदारीही समाजाने सामूहिकपणे स्वीकारावी, असा संदेश देणारा ठरला.

Share

Related posts

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

Chief Editor

एनएसयुआय विद्यार्थी काँग्रेस च्या महाराष्ट्र प्रदेश महासचिवपदी किरण पडलवार यांची निवड

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये आरोग्यविषयक जनजागृती कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

हायड्रेट हर्बलाइफ: उन्हाळ्यातील ताजगीसाठी

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

Leave a Comment