एम सी आर
Uncategorized

कंधार डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.गजानन अंबेकर!

_कंधार असोसिएशनच्या बैठकीत सर्वानुमते निर्णय; वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव_

नांदेड जिल्हा प्रतिनिधी
नरसिंग पेठकर

कंधार डॉक्टर असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ.गजानन अंबेकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. दि.१२ सप्टेंबर रोजी झालेल्या असोसिएशनच्या बैठकीत उपस्थित सदस्यांनी डॉ.अंबेकर यांच्या नावाला सर्वानुमते पसंती देत अध्यक्षपदाची जबाबदारी सोपविली.
या बैठकीस कंधार तालुक्यातील सर्व डॉक्टर यावेळी उपस्थित होते. अध्यक्षपदासाठी डॉ.गजानन अंबेकर यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर होताच उपस्थित डॉक्टरांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.डॉ.गजानन अंबेकर यांच्या नेतृत्वाखाली कंधार डॉक्टर असोसिएशनच्या माध्यमातून डॉक्टरांच्या विविध प्रश्नांना व्यासपीठ मिळण्यासोबतच वैद्यकीय क्षेत्रातील परस्पर समन्वय अधिक बळकट होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.तसेच कंधार परिसरातील नागरिकांना आरोग्यविषयक सुविधा व मार्गदर्शन अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी विविध सामाजिक व आरोग्यविषयक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
डॉक्टरांच्या व्यावसायिक प्रश्नांसोबतच समाजाप्रती असलेली वैद्यकीय क्षेत्राची सामाजिक बांधिलकी जपत आरोग्य जनजागृती,आरोग्य तपासणी शिबिरे तसेच गरजू रुग्णांसाठी विविध उपक्रम राबविण्याची भूमिका असोसिएशनच्या माध्यमातून पुढे नेली जाणार आहे.डॉ.गजानन अंबेकर यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल कंधार शहर व परिसरातील वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर,विविध क्षेत्रातील मान्यवर आणि नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
————————————–

वैद्यकीय क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव
डॉ. गजानन अंबेकर यांच्या अध्यक्षपदी झालेल्या बिनविरोध निवडीबद्दल कंधार शहर व परिसरातील डॉक्टर, विविध क्षेत्रांतील मान्यवर तसेच नागरिकांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. अनुभव, समन्वय आणि सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून कंधार डॉक्टर असोसिएशनला नवी दिशा मिळेल, असा विश्वास वैद्यकीय क्षेत्रातून व्यक्त होत आहे.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

सतत बत्तीस दिवस ‘कृष्णाकाठ’चे अभिवाचन करुन यशवंतराव चव्हाण यांना अनोखे अभिवादन!

Chief Editor

बहुव्यापी व बहुआयामी: डॉ. हरिश्चंद्र पतंगे (लेखक: डॉ.अजय गव्हाणे)

Chief Editor

एआयचे ज्ञान आत्मसात करणे काळाची गरज”* *कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांचे पत्रकारांना आवाहन

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

बदलत्या जीवनशैलीत योग्य आहाराचे महत्त्व – मीरा धुळगुंडे”

Chief Editor

Leave a Comment