एम सी आर
Uncategorized

आज शहरात आषाढी महोत्सवाचे आयोजन प्रसिद्ध गायिका कार्तिकी गायकवाड व कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीतसरीचा लाभ घ्यावा – आयोजन विठ्ठल पावडे.

नांदेड (प्रतिनिधी) – सुप्रसिद्ध गायिका व सारेगमप महाविजेता कार्तिकी गायकवाड – पिसे आणि प्रसिद्ध गायक व गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांच्या भक्तीमय संगीत कार्यक्रमाचा आषाढी महोत्सव आज शनिवार (ता.२५) रोजी शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह येथे सायंकाळी सहा वाजता आयोजित करण्यात आला आहे. तरी श्री पांडुरंगाच्या भक्तीमय संगीतसरीत चिंब होण्यासाठी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन तथा नांदेड काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी केले आहे.

प्रतिवर्षी प्रमाणे यंदा देखील आषाढी एकादशीचे औचित्य साधून काँग्रेस कमिटी उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी आषाढी महोत्सवाचे
आयोजन केले आहे. महोत्सवाचे अध्यक्ष या नात्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांची उपस्थिती राहणार आहे तर नांदेड काँग्रेस दक्षिण जिल्हाध्यक्ष तथा खासदार रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी सुप्रसिद्ध गायिका व सारेगमप महाविजेता कार्तिकी गायकवाड – पिसे आणि प्रसिद्ध गायक व गौरव महाराष्ट्राचा महाविजेता कौस्तुभ गायकवाड यांचा भक्तीमय संगीत कार्यक्रम होणार आहे. दरम्यान यंदाचा आषाढी सन्मान स्व. शिवानंद सुरकुटवार या सृजनशील कलावंतास मरणोत्तर जाहीर करण्यात आला आहे. यावेळी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय सचिव रेहाना चिश्ती, माजी आ. ईश्वरराव भोसिकर, माधवराव पा. जवळगावकर, हणमंतराव पाटील बेटमोगरेकर, प्रा. यशपाल भिंगे, सुरेश गायकवाड, डॉ. रेखाताई चव्हाण, सुरेंद्र घोडजकर, श्रावण रँपनवाड, स्मिता शहापूरकर, डॉ. दिनेश निखाते, अब्दुल हफीज, डॉ. धनराज राठोड, अब्दुल सत्तार, तिरुपती कोंढेकर, अब्दुल गफ्फार, एकनाथ मोरे, आनंद चव्हाण, राजेश पावडे, बालाजी गाडे, शंकर शिंदे, अतुल पेदेवाड, सुरज शिंदे, अक्षय नळगे आदीसह इतर मान्यवर उपस्थित राहणार आहेत. निवेदन सौ. पुजा थिगळे, साथसंगत नामांकीत वाद्यवृंद यांचे असून सुत्रसंचालन मुरलीधर हंबर्डे हे करणार आहेत. तरी श्री पांडुरंगाच्या भक्तीमय संगीतसरीत चिंब होण्यासाठी महोत्सवाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन तथा नांदेड काँग्रेस उत्तर जिल्हाध्यक्ष डॉ. विठ्ठल पावडे यांनी केले आहे.

Share

Related posts

सैनिकी मुलांचे वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पदभरती

Chief Editor

प्रथम घटक चाचणी परीक्षेची गटशिक्षणाधिकाऱ्यांकडून पाहणी शालेय परीक्षा व्यवस्था व शैक्षणिक कामकाजाबाबत समाधान व्यक्त

Chief Editor

नांदेड-किनवट मार्गावर भीषण अपघात : कार–दुचाकी समोरासमोर धडक; दोघांचा मृत्यू

Chief Editor

यशवंत ‘ मधील श्रेयस चव्हाण यांची भारतीय नौसेनेमध्ये निवड

Chief Editor

नांदेड जिल्हा निर्यातीसाठी अग्रस्थानी नेणार – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

Leave a Comment