एम सी आर

बालकलाकारांच्या अदाकारीने रंगले स्नेहसंमेलन

Uncategorized

नांदेड:
गुजराती प्राथमिक शाळेत दिनांक 21 1 26 बुधवार रोजी इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व गणेश वंदनाने झाली. स्नेहसंमेलनात विद्यार्थ्यांनी पारंपारिक संस्कृती तसेच देशभक्तीवर आधारित नृत्य सादर करून प्रेक्षकांची मने जिंकली. चिमुकल्यांच्या सादरीकरणाला पालकांकडून भरभरून दाद मिळाली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गुजराती शिक्षण संस्थेचे अध्यक्ष माननीय श्री केतनभाई नागडा, उपाध्यक्ष श्री चंद्रकांत भाई पटेल,सचिव श्री दीपक भाई दामा, कोषाध्यक्ष श्री शांतीलाल भाई पटेल ,तसेच सदस्य श्री जयंतीलाल भाई पटेल, श्री राकेश भाई शहा, श्री दीपेश भाई शहा, श्री भावेश भाई नागडा यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गुजराती प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक श्री सापडगावकर सर सर्व शिक्षक वृंद तसेच सांस्कृतिक समितीने विशेष परिश्रम घेतले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ वर्षा लाटकर व सौ प्रेमला साकोळकर यांनी तर आभार सौ मनीषा सौंदणकर यांनी केले.
आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली.

Share

Related posts

अभिरुची आस्वाद’ मध्ये ऑस्करसाठी नामनिर्देशित झालेल्या ‘कवी’ या लघुपटाचे प्रदर्शन

Chief Editor

विद्यापीठात ‘रॅगिंग प्रतिबंध व पोक्सो’ विषयावर कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर संपन्न विद्यार्थ्यांमध्ये कायदेविषयक जनजागृतीसह सुरक्षित शैक्षणिक वातावरण निर्मितीवर भर

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

योग ही विज्ञाननिष्ठ संकल्पना -प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे

Chief Editor

आधुनिक व पुरोगामी :डॉ. व्ही. एन. इंगोले’. लेखक- डॉ. अजय गव्हाणे

Chief Editor

संत शिरोमणी गोरोबा काकांच्या ७५९ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये २ ऑगस्टला भव्य शोभायात्रा, विद्यार्थी गुणगौरव आणि समाजभूषण सत्कार सोहळा

Chief Editor

Leave a Comment