प्रेम, माया आणि कर्तृत्वाचा सुंदर संगम : आदरणीय सौ. अमिता अशोकराव चव्हाण ( वाढदिवसा निमित्त अभिष्टचिंतन)
नांदेड:प्रतिनिधी
काही व्यक्तिमत्त्वे अशी असतात की त्यांच्याशी असलेले नाते केवळ नात्यापुरते मर्यादित राहत नाही; त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे, आपुलकीच्या वागण्यामुळे आणि माणसांना जोडून ठेवण्याच्या गुणामुळे ते नाते मनाचे आणि भावनेचे बनते. आदरणीय सौ. अमिता अशोकराव चव्हाण हे असेच एक प्रेमळ, संवेदनशील, कर्तव्यदक्ष आणि माणुसकी जपणारे व्यक्तिमत्त्व आहे.
अमिताभाभींच्या व्यक्तिमत्त्वातील सर्वात सुंदर पैलू म्हणजे प्रत्येकाला सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती. कुटुंबातील सदस्य असो, नातेवाईक असोत, महिला कार्यकर्त्या असोत किंवा ग्रामीण भागातील सामान्य नागरिक,प्रत्येकाची आस्थेने विचारपूस करणे, त्याच्या सुख-दुःखात सहभागी होणे आणि गरजेच्या वेळी आधार देणे, ही त्यांची सहज प्रवृत्ती आहे. त्यांच्या मनात माणसांबद्दल असलेली कळकळ त्यांच्या प्रत्येक कृतीतून जाणवते. ज्यांना सासर कडून संपन्न असा राजकीय वारसा लाभला, सासरे जलक्रांतीचे जनक मराठवाड्याचे भाग्यविधाते देशाचे माजी गृहमंत्री महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री शेती माती, पाणी आणि माणसं यांच्यासाठी काम करणारे जलनायक डॉ. शंकरराव चव्हाण आणि पती,,महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री विकासाभिमुख नेतृत्व अशोकराव चव्हाण त्यांच्या दोघांचेही राजकारणाचा जवळून अनुभव घेतलेला असल्यामुळे आमदार म्हणून भोकर मतदार संघात काम करत असताना,मतदार संघ आणि मतदार संघातील लोकांच्या कामाचं नियोजन, विकासाच्या विषयावर त्यांनी अधिक लक्ष केंद्रित केलं तोच वारसा आपल्या मुलीकडे आमदार (श्रीजया चव्हाण )हस्तांतरित केला
महिलांप्रती विशेष आपुलकी :
महिला कार्यकर्त्या हा त्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे.
