एम सी आर

स्वारातीम विद्यापीठाच्या भाषा संकुलात अभिजात मराठी भाषा सन्मान दिवस साजरा;

Uncategorized

*मराठीतील अभिजात साहित्याचे प्रकट वाचन

अभिजात मराठी भाषा सन्मान दिवसाच्या निमित्ताने स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भाषा, वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलात अभिजात मराठी साहित्याचे प्रकट वाचन करण्यात आले.

केंद्र सरकारने दि.३ ऑक्टोबर, २०२४ रोजी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला आहे. यानिमित्ताने महाराष्ट्रभर विविध कार्यक्रमांचे आयोजन ३ ऑक्टोबर रोजी करण्यात येतात. महाराष्ट्र शासनाने हा दिवस ‘अभिजात मराठी भाषा दिन’ म्हणून जाहीर केला आहे.

या दिवसाचे औचित्य साधून भाषा वाङ्मय व संस्कृती अभ्यास संकुलातील प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांनी मराठीतील अभिजात साहित्याचे प्रकट वाचन केले. आणि मराठी भाषेच्या दोन हजार वर्षांच्या इतिहासाला उजाळा दिला. भाषा संकुलाचे संचालक डॉ. पृथ्वीराज तौर, मराठी भाषा अधिकारी डॉ. पी. विठ्ठल आणि आदिवासी साहित्याचे अभ्यासक डॉ. वैजनाथ अनमुलवाड यांनी विविध कलाकृतींचे प्रकट वाचन करून विद्यार्थ्यांना अभिजात मराठी भाषेच्या वाटचालीचा प्रत्यय दिला.

यावेळी गाथासप्तशती, लीळाचरित्र, अमृतानुभव, ज्ञानेश्वरी, संत नामदेव गाथा, सकल संतगाथा, संत तुकाराम गाथा, मराठीतील निवडक पोवाडे व लावण्या आणि ब्रिटिश आमदानीतील नाट्यपदांचे अभिवाचन करण्यात आले.

विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर व प्र कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली
भाषा संकुलाच्या वतीने अभिजात मराठी भाषा सन्मान सप्ताहात ‘शब्दांची जुगलबंदी’ या राज्यस्तरीय स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून दिनांक ७ ऑक्टोबर रोजी कवीसंमेलन, कथाकथन व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

आजच्या प्रकट अभिवाचनाच्या कार्यक्रमास भाषा संकुलातील प्राध्यापक व विद्यार्थी उपस्थित होते.

चौकट
भाषा संकुलात मराठी भाषेसंदर्भात वर्षभर प्रयोगशिल उपक्रम आयोजित केले जातात.
संकुलाचे संचालक डॉ.पृथ्वीराज तौर आणि डॉ पी. विठ्ठल हे महाराष्ट्र शासनाच्या भाषा सल्लागार समितीचे सदस्य असून मराठी भाषेचे धोरण ठरवणाऱ्या समितीमध्ये त्यांचा सहभाग होता. याशिवाय डॉ. वैजनाथ अनमुलवाड आदिवासी संस्कृती व बोलींचे अभ्यासक म्हणून परिचित आहेत.
——+++++——

Share

Related posts

नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Chief Editor

बंजारा आणि शीख गुरूंचे नाते: व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

यशवंत ‘ मधील रोहिणी सुधाकर चव्हाण यांना प्राणीशास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

अर्धापूर अपघातस्थळी प्रोफेसर. डॉ. विशाल बेलुरेंची देवदूतासारखी मदत; चिमुकलीचा जीव वाचवण्यासाठी घेतला धाडसी पुढाकार

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये श्री.सुरेश धूत संचालित ध्यानप्रयोगांनी ध्यानमग्नता

Chief Editor

Leave a Comment