एम सी आर
World

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ विभागीय केंद्र नांदेड येथेवरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची बैठक संपन्न

नांदेड :(डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी सत्र व पुनर्परीक्षा दिनांक ७ जानेवारी २०२६ पासून आयोजित करण्यात आलेल्या आहेत. या परीक्षांच्या यशस्वी व पारदर्शक आयोजनासाठी विद्यापीठाकडून विविध केंद्रांवर वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने दिनांक ६ जानेवारी २०२६ रोजी विभागीय केंद्र, नांदेड येथे वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांची मार्गदर्शन बैठक आयोजित करण्यात आली होती.

सदर बैठकीस परीक्षेकरीता नियुक्त करण्यात आलेले सर्व वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षक उपस्थित होते. नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार कलेपवार सर यांनी परीक्षेचे नियम, जबाबदाऱ्या, शिस्त व कार्यपद्धती याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. तसेच प्रा. दिग्विजय देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त करत परीक्षेच्या पारदर्शक व शिस्तबद्ध अंमलबजावणीवर भर दिला.

या बैठकीस विभागीय केंद्र नांदेड येथील दिलीप थोरात, राजू खरपडे, विकास पावडे व नितेश देशमाने यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. बैठकीमुळे वरिष्ठ बहिस्थ पर्यवेक्षकांना परीक्षासंदर्भातील मार्गदर्शक सूचना स्पष्ट झाल्या असून आगामी परीक्षा सुरळीतपणे पार पडण्यास मदत होणार आहे.

Share

Related posts

Unstable Situations Require Police In Riot Gear Face Off With Protesters At Zone 5

aadvaith46@gmail.com

Precinct Data Shows Rich, White Neighborhoods Flipping Democratic in 2016. Will It Last?

aadvaith46@gmail.com

Pruitt’s Successor Wants Rollbacks, Too. And He Wants Them to Stick

aadvaith46@gmail.com

Act of Defiance Casts Harsh Light on Europe’s Deportations of Asylum Seekers

aadvaith46@gmail.com

Prime Minister of Portugal, Antonio Costa Arrives For A Meeting With European Union Leaders

aadvaith46@gmail.com

Facing Investigation, Ex-President Uribe Resigns From Senate in Colombia

aadvaith46@gmail.com

Leave a Comment