एम सी आर

सेवा संकल्प अभियाना’तंर्गत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विशेष शिक्षकांचा गौरव

Uncategorized

नांदेड (विशेष प्रतिनिधी):

महाराष्ट्र शासनाच्या ‘सेवा संकल्प अभियान’ व दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालय, पुणे यांच्या निर्देशानुसार, दिशा अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करून बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी उल्लेखनीय योगदान देणाऱ्या विशेष शिक्षकांचा जिल्हास्तरीय गौरव सोहळा आज, ५ नोव्हेंबर रोजी उत्साहात संपन्न झाला. जिल्हा परिषद नांदेडचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश पाटील , श्री अमित राठोड सहाय्यक आयुक्त दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय नांदेड यांच्या हस्ते या विशेष शिक्षकांना सन्मानपूर्वक प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. दिव्यांग सक्षमीकरण आयुक्तालयामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘दिशा अभियाना’च्या माध्यमातून बौद्धिक अक्षम मुलांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी जिल्ह्यातील विशेष शिक्षक सातत्याने समर्पित भावनेने कार्य करत आहेत. या कार्याची दखल घेऊन जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा विशेष सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला.

या विशेष शिक्षक गौरव सोहळयास प्रमुख पाहुणे म्हणून म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश पाटील, दिव्यांग सक्षमीकरण कार्यालयाचे सहाय्यक आयुक्त श्री. अमित राठोड, सहाय्यक सल्लागार श्री. दिनकर नाठे आणि दिशा प्रकल्पाचे समन्वयक संघरत्न धूतराज उपस्थित होते.

याप्रसंगी मार्गदर्शन करताना मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. महेश पाटील यांनी विशेष मुलांच्या सर्वांगीण विकासात विशेष शिक्षकांची भूमिका अत्यंत मोलाची असल्याचे नमूद करत शिक्षकांच्या कार्याचे कौतुक केले. व सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत दिशा अभियानामुळे बौद्धिक अक्षम विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठी गती मिळत असल्याचे यावेळी सांगण्यात आले. कार्यक्रमास नांदेड जिल्ह्यातील विशेष शाळेतील मुख्याध्यापक गजानन मोरे, मधुकर मनुरकर,भगवान शिंदे, व्यंकट राठोड, शेख असिफ, पांचाळ, वायकुळे यांच्यासह नांदेड जिल्ह्यातील सर्व बौद्धिक अक्षम *शाळांमधील विशेष* शिक्षक, शिक्षिका व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share

Related posts

उच्च शिक्षण सहसंचालक कार्यालयासमोर नेट-सेट, पीएच. डी. धारकांचे धरणे आंदोलन

Chief Editor

हायड्रेट हर्बलाइफ: उन्हाळ्यातील ताजगीसाठी

Chief Editor

दिव्यांगाच्या प्रश्नांसाठी जिल्हाधिकारी नांदेड यांनी वेळोवेळी बैठकितील प्रोसिडींगमधील प्रश्नांची सोडवणुक व वरीष्ठाच्या आदेशाची पंधरा दिवसांत अंमलबजावणी नाहि झाल्यास हदगाव तहसिलदार साहेब यांच्या दालनात स्व ईच्छा मरण्याची परवानगी मिळेपर्यंत आंदोलनाचा निवेदनाद्वारे दिला ईशारा

Chief Editor

संग्रहालयीन नमुन्यांपासून वन्यजीव संवर्धनापर्यंतचा अनोखा ज्ञानप्रवास: यशवंत महाविद्यालयात राष्ट्रीय वन्यजीव सप्ताहानिमित्त विशेष उपक्रम; (२४० हून अधिक विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग)

Chief Editor

गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कारातून धनगर समाजात शैक्षणिक चळवळीला बळ

Chief Editor

माझ्या आई-बाबांच्या अमृतमहोत्सवपूर्ती व 77 व्या वर्षातील पदार्पणानिमित्त एका मुलाच्या मनोगतातून..डॉ. विजय नागोराव भोसले

Chief Editor

Leave a Comment