प्रतिनिधी दिनांक 28 ऑक्टोबर
भारतीय जनता पार्टी हदगाव पूर्व मंडळच्या वतीने महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, खासदार अशोकराव चव्हाण यांच्या वाढदिवसानिमित्त हदगाव तालुकाध्यक्ष भागवत देवसरकर यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजक डॉ.संदीप कारंजकर यांच्या पुढाकारातून तामसा येथे सामाजिक बांधिलकी व दुष्काळाचे भान जपत बॅनर व इतर अनावश्यक खर्च टाळत सामाजिक उपक्रम राबविण्यात आला.
या निमित्ताने तामसा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रुग्णांना तसेच आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले, आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण साजरे करत अशोकराव चव्हाण यांचा वाढदिवस सामाजिक बांधिलकी जपत उत्साहात साजरा करण्यात आला,समाजातील गरजू व्यक्तींच्या चेहऱ्यावर हास्य फुलवणे, रुग्णांना आधार देणे आणि विद्यार्थ्यांच्या आनंदात सहभागी होणे, हाच या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता,यावेळी आयोजक तथा तामसा सर्कलचे भाजपा प्रभारी डॉ. संदीप कारंजकर यांच्यासह विशाल पेंटेवाड, पत्रकार अर्जुन महाराज जोशी, शिवानंद पुंजरवाड, विजय कसेवाड यांच्यासह अनेक पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
—
