एम सी आर
Uncategorized

नांदेड SBI सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी आदित्य सेनगावकरचा राजस्थानमध्ये गूढ मृत्यू

नांदेड, प्रतिनिधी : नांदेड येथील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या (SBI) डॉक्टर लेन शाखेत उघडकीस आलेल्या सुमारे ८५ लाख रुपयांच्या बनावट सोनेतारण घोटाळ्यातील मुख्य आरोपी तथा बँकेचा रोकड व्यवस्थापक आदित्य प्रकाश सेनगावकर याचा राजस्थानातील भरतपूर येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे संपूर्ण प्रकरणाला नवे वळण मिळाले असून घोटाळ्याच्या तपासाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत.

वजिराबाद पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात आदित्य सेनगावकर आणि SBI डॉक्टर लेन शाखेतील कर्मचारी जीवन माधवराव जगदाळे यांच्यावर गुन्हा नोंदविण्यात आला होता. बँकेत तारण ठेवलेल्या अस्सल सोन्याऐवजी बनावट सोने ठेवून दोघांनी संगनमताने सुमारे ८५ लाख रुपयांचा अपहार केल्याचा आरोप आहे. हा गैरप्रकार उघडकीस आल्यानंतर बँकेच्या मुख्य व्यवस्थापकांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला होता.

गुन्हा दाखल होताच जीवन जगदाळे पोलिसांच्या ताब्यात आला; मात्र आदित्य सेनगावकर हा गुन्हा नोंदविण्यापूर्वीच नांदेडमधून बेपत्ता झाला होता. त्याच्या पत्नीनेही त्याच्या बेपत्ता असल्याची तक्रार पोलिसांकडे दिली होती. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध घेण्यासाठी विविध राज्यांमध्ये तपास सुरू ठेवला होता.

दरम्यान, आदित्य सेनगावकर राजस्थानातील भरतपूर येथे असल्याची माहिती समोर आली. तेथे त्याला अस्वस्थ वाटू लागल्याने एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार त्याने आत्महत्या केलेली नसल्याचे अधिकृत सूत्राच्या माहितीवरून सांगण्यात आले

भरतपूर पोलिसांना आदित्यच्या बॅगेत स्टेट बँक ऑफ इंडियाचे ओळखपत्र आढळून आले. त्यानंतर त्यांनी संबंधित माहिती बँक आणि नांदेड पोलिसांना कळविली. आदित्यची पत्नी व आई सध्या छत्रपती संभाजीनगर येथे वास्तव्यास असून मृत्यूची माहिती मिळाल्यानंतर त्यांचे काही नातेवाईक राजस्थानला रवाना झाले आहेत.

या घोटाळ्याचा तपास अद्याप सुरू असून मुख्य आरोपीच्या मृत्यूमुळे प्रकरणाला वेगळे वळण मिळाले आहे. पोलिसांकडून आता उपलब्ध पुराव्यांच्या आधारे उर्वरित आरोपींविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

नांदेडमधील बँकिंग क्षेत्रात मोठी खळबळ उडवून देणाऱ्या या घोटाळ्याचा तपास आता कोणत्या दिशेने जातो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.— एमसीआर न्यूज

Share

Related posts

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त *एम.डी.हॉस्पिटल,नांदेड* येथे *मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

Chief Editor

भक्ती आणि शक्ती हे आयुष्य जिंकण्याचे सूत्र – संजय भोसले

Chief Editor

अर्थशास्त्रातील करिअर संधीवर प्राध्यापक सागर कोंडेकर यांचे मार्गदर्शन कौशल्य विकासावर भर देण्याचे आवाहन

Chief Editor

बी. रघुनाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयास विविध 48 ग्रंथ भेट

Chief Editor

भगवान रजनीश कम्यूनमध्ये सक्रिय ध्यान अभियानास उत्साहात प्रारंभ

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात आंतरराष्ट्रीय खगोलभौतिकी परिषद

Chief Editor

Leave a Comment