एम सी आर
Uncategorized

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत मोठा निर्णय! लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार बिनविरोध.

नांदेड : प्रतिनिधी
नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या आगामी निवडणुकीसाठी महत्त्वाचा निर्णय घेत नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयातील सहकारी पतसंस्था मर्यादित, नांदेड येथील संचालक डॉ. किशोर इंगळे यांना मतदानाचा अधिकार सर्वानुमते बिनविरोध देण्यात आला आहे. या निर्णयामुळे शैक्षणिक क्षेत्रातील प्रतिनिधित्वाला बळ मिळाल्याचे मानले जात आहे.
ही महत्त्वपूर्ण बैठक पतसंस्थेचे अध्यक्ष डॉ. मनीष देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीदरम्यान नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसंदर्भात विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली आणि अखेरीस डॉ. किशोर इंगळे यांच्या नावावर एकमताने ठराव मंजूर करण्यात आला.
या बैठकीला पतसंस्थेचे सचिव डॉ. गोपालकृष्ण सांगवीकर, प्रा. अरविंद बारबिंड, डॉ. चंद्रशेखर येंगडे, राजकुमार जाधव तसेच इतर संचालक मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती.
डॉ. किशोर इंगळे हे नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयात संख्याशास्त्र विभाग प्रमुख म्हणून कार्यरत असून ते एन.सी.सी. अधिकारी म्हणूनही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतात. त्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेत त्यांना ही जबाबदारी देण्यात आल्याचे सांगण्यात आले.
या निवडीमुळे महाविद्यालयीन व सहकार क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून विविध स्तरातून डॉ. किशोर इंगळे यांचे अभिनंदन करण्यात येत आहे. त्यांच्या माध्यमातून बँकेच्या निवडणुकीत सकारात्मक आणि सक्षम प्रतिनिधित्व मिळेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Share

Related posts

अर्थशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन निमित्त भितीपत्रकाचे प्रकाशन

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘जागतिक आरोग्य दिना’निमित्त आरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

यशवंत ‘मध्ये ग्रंथालय सुविधांवर कार्यशाळा संपन्न*

Chief Editor

महापालिका नांदेडच्या शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात शहरातील अपघातांना आळा घालण्यासाठी गतिरोधक बसवण्याचा समावेश करावा

Chief Editor

नियमांच्या चौकटीत माणुसकी जपणारा अधिकारी शेख सिकंदर अली

Chief Editor

Leave a Comment