एम सी आर

अर्थशास्त्र विभागातर्फे राष्ट्रीय शेतकरी दिन निमित्त भितीपत्रकाचे प्रकाशन

Uncategorized

परभणी: प्रतिनिधी

कै .सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त देशाचे पाचवे पंतप्रधान आणि शेतकऱ्यांची कठोर ,मेहनत, संघर्ष आणि समर्पणाची आठवण करून देणारे ‘शेतकऱ्यांचे मसीहा’ ज्यांनी आपल्या कार्यकाळात जमीन सुधारणा, नाबार्ड ची स्थापना आणि कृषी उत्पन्न बाजार विधेयकाद्वारे शेतकऱ्यांच्या हितासाठी मोठे काम केले असे “चरण सिंह चौधरी “यांचा जन्मदिवस “राष्ट्रीय शेतकरी दिन “म्हणून साजरा केला जातो .त्या निमित्ताने भित्तिपत्रक तयार करून प्रकाशित केले आहे .
‘राष्ट्रीय शेतकरी दिनाचे महत्त्व’ या विषयावर अर्थशास्त्र विभागाचा प्रमुख डॉ. सी .व्ही .पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार बी .ए .प्रथम वर्षाच्या रूपाली जाधव ,ऋतुजा देशमुख ,अंजली बालटकर ,किरण निकाळजे ,सावित्री कांबळे या विद्यार्थिनींनी हस्तलिखित तयार केलेल्या भितीपत्रकाचे विमोचन संस्थेचे अध्यक्ष मा. श्री .हेमंतराव जामकर साहेब यांच्या शुभहस्ते करण्यात आले. त्याप्रसंगी उपस्थित मान्यवर डॉ. अभयजी सुभेदार, मा.डॉ.संजयजी टाकळकर, मा. अँड. श्री .मंगेश राव सुभेदार मा. श्री .हर्षल सुभेदार मा. डॉ.समीर संजयराव टाकळकर, प्राचार्य डॉ.रामचंद्र भिसे व अर्थशास्त्र विभागातील डॉ.सी . व्ही .पाटील , डॉ.व्हि. के .शेळके.व सर्व प्राध्यापक वृंद,तसेच प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थिनी या सर्वांच्या उपस्थितीत झाला.

Share

Related posts

मुक्त विद्यापीठाच्या हिवाळी परीक्षा कॉपी मुक्त वातावरणात सुरूपरीक्षेतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्षता पथक कार्यर

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

ग्रामीण मातंग स्त्री ग्रंथास राज्यस्तरीय पुरस्कार

Chief Editor

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

Leave a Comment