एम सी आर

‘यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Uncategorized

नांदेड:(दि. ५ जुलै २०२६)
इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ पब्लिक एडमिनीस्ट्रेशन,नवी दिल्ली ही भारत सरकारच्या कर्मचारी, लोकतक्रार व निवृत्तीवेतन मंत्रालयाअंतर्गत लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणाविषयी कार्य करणारी लोकप्रशासन क्षेत्रातील राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च संस्था आहे.
नवी दिल्ली येथील आयआयपीए संस्थेचे २२ वर्षे राष्ट्रीय अध्यक्ष भारताचे माजी गृहमंत्री तथा आधुनिक भगीरथ कै. डॉ. शंकररावजी चव्हाण होते.
प्रस्तुत राष्ट्रीय संस्थेचे नांदेडचे जिल्हाधिकारी तथा आयआयपीएचे अध्यक्ष श्री.राहुल कर्डिले यांच्या मार्गदर्शनाखाली स्वतंत्र शाखा स्थापन करण्यात आली असुन त्यास केंद्रीय संस्थेने मान्यता प्रदान केली आहे. प्रशासकीय भवन परिसर, कौठा येथे स्वतंत्र कार्यालय सुरू करण्यात आले आहे.
नांदेडचे जिल्हाधिकारी तथा नांदेड शाखेचे पदसिद्ध अध्यक्ष श्री. राहुल कर्डिले यांच्या अध्यक्षतेखाली कार्यकारी मंडळाची बैठक नुकतीच संपन्न झाली. या बैठकीमध्ये यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ.मीरा फड यांची कार्यकारी मंडळात स्वीकृत सदस्यपदी निवड करण्यात आली आहे.
या सन्मानपूर्वक निवडीबद्दल स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन.शिंदे, लेफ्टनंट डॉ.रामराज गावंडे, देगलूर महाविद्यालयातील डॉ. बालाजी कत्रुवार, डॉ. कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ.अजय गव्हाणे, डॉ. विरभद्र स्वामी, डॉ. पद्मा राव, डॉ. संगीता शिंदे( ढेंगळे), डॉ. शबाना दुर्राणी, प्रा. राजश्री भोपाळे, डॉ. स्वाती मदनवाड, डॉ. रत्नमाला म्हस्के, डॉ. अजय मुठे, डॉ. शिवराज बोकडे, डॉ.भरत कांबळे, डॉ.संजय जगताप, डॉ. संदीप पाईकराव, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक — आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

नशामुक्त युवा – विकसित भारत’ जिल्हास्तरीय सांस्कृतिक स्पर्धांना उत्स्फूर्त प्रतिसाद

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स आरोग्य सल्लागार मीरा धुळगुंडे नांदेड

Chief Editor

Leave a Comment