एम सी आर
Uncategorized

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

नांदेड;

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात दीर्घकाळ समर्पित सेवा बजावून सेवानिवृत्त होत असलेल्या तीन कर्मचाऱ्यांचा सपत्नीक सेवापूर्ती गौरव सोहळा अधिसभा सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. विद्यापीठाच्या वतीने सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सपत्नीक शाल, स्मृतीचिन्ह, सन्मानपत्र तसेच साडी-चोळी देऊन सन्मान करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन हे होते. व्यासपीठावर कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर पवार, अधिष्ठाता डॉ. एम. के. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, नवोपक्रम व नवसंशोधन मंडळाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर तसेच राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉ. मारुती गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी विद्यापीठातील विविध विभागांत उल्लेखनीय सेवा बजावलेल्या श्याम भरतराव डाकोरे (लेखाधिकारी), श्यामराव शेषराव हंबर्डे (सेवक) आणि आसाराम बापूराव काटकर (सफाईदार) यांचा सपत्नीक सन्मान करण्यात आला.
लेखाधिकारी श्याम भरतराव डाकोरे यांनी विद्यापीठात सुमारे ३० वर्षे सेवा बजावत संपदा विभाग, लेखा विभाग, भंडार विभाग आणि प्रकाशन विभागात कार्य केले. 
श्यामराव शेषराव हंबर्डे यांनी १९९६ पासून सेवक पदावर कार्यरत राहून संपदा विभाग, विद्यार्थी विकास विभाग, प्रकाशन विभाग आणि परीक्षा विभागात आपली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडली. तर आसाराम बापूराव काटकर यांनी सफाईदार पदावर कार्यरत राहून पात्रता विभाग, स्थावर विभाग, कुलगुरू निवासस्थान, शैक्षणिक विभाग, माध्यमशास्त्र संकुल तसेच श्री गुरु गोविंद सिंगजी अध्यासन संकुल व संशोधन केंद्र येथे सेवा बजावली.
अध्यक्षीय समारोपात बोलताना प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या कार्याचा गौरव करताना, “विद्यापीठ हे केवळ संस्था नसून एक कुटुंब आहे. या कुटुंबातील सदस्यांच्या प्रदीर्घ आणि निष्ठावंत सेवेचा गौरव करणे ही विद्यापीठाची समृद्ध परंपरा आहे,” असे प्रतिपादन केले.
सत्काराला उत्तर देताना लेखाधिकारी श्याम डाकोरे यांनी गेल्या तीन दशकांतील सहकार्याबद्दल विद्यापीठ प्रशासन, अधिकारी, सहकारी कर्मचारी यांचे आभार व्यक्त केले. यावेळी उपस्थित सहकाऱ्यांनीही निवृत्त कर्मचाऱ्यांविषयीच्या आठवणींना उजाळा देत त्यांच्या कार्याचा गौरव केला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन ज्ञानस्रोत केंद्राचे संचालक डॉ. जगदीश कुलकर्णी यांनी केले. या सोहळ्यास विद्यापीठातील प्राध्यापक, अधिकारी, कर्मचारी, मान्यवर तसेच सत्कारमूर्तींचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते.
————————————

Share

Related posts

नेसुबो महाविद्यालयात तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठात ‘विकास अध्ययन’ पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरू

Chief Editor

नांदेड: शहरातील डी मार्ट रस्त्यावर तिहेरी हत्याकांड; गँगवॉरनंतर रुग्णालयातही खून

Chief Editor

रुपाली चाकणकर यांच्या हस्ते कमलोत्सवाचे उदघाटन संपन्न.

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

Leave a Comment