एम सी आर
Uncategorized

रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

नांदेड : “स्टॅटिस्टिकल मॉडेलिंग ऑफ जीडीपी बेस्ड ऑन द इंडेक्स नंबर : अ कंपॅरेटिव्ह स्टडी बिटवीन इंडिया अँड चायना” या विषयावर सखोल, दर्जेदार व संशोधनपर अभ्यास पूर्ण करून डॉ. रियाद सेनन यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड अंतर्गत विज्ञान व तंत्रज्ञान विद्याशाखेतील संख्याशास्त्र विषयात डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी (Ph.D.) ही मानाची पदवी संपादन केली आहे.
डॉ. रियाद सेनन यांनी हे संशोधन नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालय, नांदेड येथील संख्याशास्त्र विभागप्रमुख तथा एन.सी.सी. अधिकारी लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली पूर्ण केले. भारत आणि चीन या आशियातील दोन प्रमुख अर्थव्यवस्थांच्या सकल देशांतर्गत उत्पादनाच्या (GDP) निर्देशांक पद्धतीवर आधारित तुलनात्मक अभ्यासातून आर्थिक वाढीच्या विविध पैलूंचे सखोल सांख्यिकीय विश्लेषण या संशोधनामध्ये करण्यात आले आहे. संशोधनातील निष्कर्ष आर्थिक नियोजन, धोरणनिर्मिती आणि विकास अभ्यासासाठी महत्त्वपूर्ण व उपयुक्त ठरणारे असल्याचे मानले जात आहे.
पीएच.डी. प्रबंधाच्या मौखिक परीक्षेसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर येथील ख्यातनाम संख्याशास्त्रज्ञ तथा महाराष्ट्र राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य डॉ. ओमप्रकाश जाधव यांनी बाह्य परीक्षक म्हणून संशोधनाचे मूल्यमापन केले. ही मौखिक परीक्षा गणितीय संकुलाच्या संचालिका डॉ. रूपाली जैन यांच्या अध्यक्षतेखाली यशस्वीरीत्या संपन्न झाली.
डॉ. रियाद सेनन यांच्या या उल्लेखनीय शैक्षणिक यशाबद्दल विद्यापीठ परिसर, महाविद्यालयीन क्षेत्र तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे संशोधन क्षेत्रात कार्यरत असलेल्या नव्या पिढीला निश्चितच प्रेरणा मिळणार असून नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाच्या उज्ज्वल शैक्षणिक परंपरेत आणखी एका मानाच्या शिरपेचाची भर पडली आहे.
या उल्लेखनीय यशाबद्दल कुलसचिव डॉ. डी. डी. पवार, अभिनव भारत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री. बालासाहेब पांडे, सचिवा एडवोकेट सौ.वनिता ताई रवींद्र जोशी, कोषाध्यक्ष श्री. कैलाशचंदजी काला, प्राचार्य डॉ. महेंद्रकुमार कुलकर्णी, डॉ. नितीन दारकुंडे, डॉ. अनिकेत मुळे, डॉ. विकास जाधव, डॉ. एम. आर. फेगडे, डॉ. संदीप काळे, डॉ. पंकज यादव तसेच विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे माजी समन्वयक डॉ. डी. डी. पवार, तसेच विविध प्राध्यापक, प्राध्यापिका, संशोधक विद्यार्थी, नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयाचे प्राध्यापकवृंद, कर्मचारी, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी डॉ. रियाद सेनन व त्यांचे मार्गदर्शक लेफ्टनंट डॉ. किशोर इंगळे यांचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

Share

Related posts

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात ‘अमृत कौशल्य उद्यम विकास योजना’अंतर्गत* *मोफत कौशल्य व उद्योजकता प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये सुरेश धूत संचालित ध्यानधारणा उपक्रमाचे आयोजन

Chief Editor

संत गाडगेबाबा यांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्नशील – महापौर कविता मुळे

Chief Editor

पद्मश्री डॉ.स्मिता रविंद्र कोल्हे यांना सन २०२४- २५ या वर्षीचा कै.सौ.कमलताई जामकर दर्पण पुरस्कार जाहीर.

Chief Editor

Leave a Comment