एम सी आर
Uncategorized

छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनानिमित्त *एम.डी.हॉस्पिटल,नांदेड* येथे *मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर

नांदेड:(डॉ.प्रवीणकुमार सेलूकर)
छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त* समाजोपयोगी उपक्रम म्हणून एम.डी.हॉस्पिटल, नांदेड यांच्या वतीने बुधवार दि.११ मार्च २०२६ रोजी मोफत आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
छत्रपती संभाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्यासाठी आपले संपूर्ण आयुष्य अर्पण केले. त्यांच्या शौर्य,त्याग आणि बलिदानाच्या स्मरणार्थ समाजासाठी उपयुक्त असे उपक्रम राबविण्याच्या उद्देशाने *एम.डी.हॉस्पिटलचे संचालक डॉ.मन्मथ माधवराव डामरंचे* यांच्या पुढाकारातून या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या शिबिरामध्ये नागरिकांसाठी मोफत आरोग्य तपासणी ज्यामध्ये बीपी,शुगर, वजन, ECG,रक्त तपासणी,दात तपासणी,नेत्र तपासणी,कान,नाक,घसा तपासणी, मुलींचे व स्त्रियांचे विविध आजार, लहान बाळांचे आजार,सुवर्णप्राशन शिबिर,मुलांचे व्यक्तिमत्व घडावे म्हणून मोफत बालसंस्कार वर्ग तसेच विविध आजारांवरील मार्गदर्शन करण्यात येणार आहे.याशिवाय स्वेच्छा रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले असून रक्तदानाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना मदत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
या उपक्रमासाठी एम.डी. हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांची टीम सहभागी होणार असून त्यामध्ये डॉ.बुरांडे मॅम,
डॉ स्वाती मॅम,डॉ. विभुते सर, डॉ बोमनाळे सर,डॉ अभिषेक पदिला सर, डॉ दंडे सर, डॉ लाटकर सर, डॉ तरटे सर, डॉ राचेवाड सर,
डॉ.केशव सर, डॉ. शिवलिंग सर ,डॉ.काळेश्वर, डॉ कद्रेकर सर
श्री लॅब चे गुलाब, करण,शुभम,
सेवा लॅब चे श्री कैलास राठोड
आर्यावर्त मेडिकल चे मनोज देशमुख, माहेश्वरी मॅडम
शिव मेडिकल अँड एजन्सी चे
श्रीहरी लोणालकर आणि कपिल, ओमकार
ओम बुक सेंटर आणि शुभम हॉटेल तसेच विचार परिवार, मित्र परिवार, कौटुंबिक परिवार नाईक नगर ,आनंद नगर परिसरातील सर्व पेशंट मंडळी आदींचा समावेश आहे.या शिबिराला जिजाऊ ब्लड बँकेचे संचालक सूरज पाटील व त्यांच्या टीमचेही सहकार्य लाभणार आहे. मागच्या वर्षीचे सर्व रक्तदाते पुन्हा एकदा रक्तदान करणार आहेत आणि *नवीन रक्तदान करणाऱ्यांची नोंदणी सुद्धा चालू झालेली आहे* ज्यात पहिल्यांदाच रक्तदान करणारे तरुण आणि मुली सुद्धा आहेत.
या शिबिराचा लाभ नांदेड शहर परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने घ्यावा तसेच स्वेच्छेने रक्तदान करून गरजू रुग्णांना जीवनदान देण्याच्या या सामाजिक उपक्रमात सहभागी होऊन *छत्रपती संभाजी महाराजांना मानाचा मुजरा करावा* असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Share

Related posts

ज्ञानदानातून वाढदिवस साजरा – एक वेगळी आणि प्रेरणादायी परंपरा!

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठाच्या विद्यार्थ्यांच्या स्टार्टअपला भारत सरकारची मान्यता;* *‘डेनिका लॅब टेक सोल्यूशन्स LLP’ची यशस्वी भरारी

Chief Editor

कॅल्शियम हे एक आवश्यक मिनरल आहे जे आपल्या शरीराच्या अनेक कार्यांसाठी आवश्यक आहे. मीरा धुळगुंडे

Chief Editor

बंजारा आणि शीख गुरूंचे नाते: व्यापार, श्रद्धा आणि शौर्याचा एक अपरिचित इतिहास

Chief Editor

श्रीकृष्ण जन्माष्टमी व गोपाळकाला उत्सवाचे आयोजन

Chief Editor

यशवंत ‘ मधील रोहिणी सुधाकर चव्हाण यांना प्राणीशास्त्रात पीएच.डी.

Chief Editor

Leave a Comment