एम सी आर
Uncategorized

पुलगाव येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय किक बॉक्सिंग स्पर्धेत नांदेड जिल्ह्याच्या खेळाडूंची दैदिप्यमान कामगिरी

प्रतिनिधी
दि. 08 ते 10 दरम्यान पुणे जिल्ह्यातील पुलगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेमध्ये नांदेड जिल्ह्यातील तसेच ब्लेज कॉम्बॅट अँड फिटनेस क्लबच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत तब्बल 22 पदकांची कमाई केली. राज्यभरातील बलाढ्य खेळाडूंमध्ये नांदेडच्या खेळाडूंनी आपली वेगळी छाप उमटवत सुवर्ण, रौप्य व कांस्य पदकांची लयलूट केली.
विशेष म्हणजे, या स्पर्धेतील पदक विजेत्या अनेक खेळाडूंची आगामी राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड करण्यात आली असून, नांदेड जिल्ह्यासाठी ही अत्यंत अभिमानाची बाब ठरली आहे.

पदक विजेते खेळाडू :
तेजस सावते – रौप्य पदक
कुणाल वाघमारे – सुवर्ण पदक
जयदीप मोरे – सुवर्ण पदक
अरणव कुमठेकर – सुवर्ण पदक व कांस्य पदक
यश खेडकर – सुवर्ण व रौप्य
ज्योतिरादित्य मुठे – 2 रौप्य
सृष्टी मेंढेकर – दोन रौप्य
आयुषी ढगे – कांस्य
मोहम्मद अब्दुल्ला – रौप्य
इरफान खान – सुवर्ण व रौप्य
जैनब शेख – 2 कांस्य
भार्गवी भंडारे – रौप्य
सुखवीर बुटार – रौप्य
विनयकुमार श्रीराम – सुवर्ण
गनराज शिरमेवार – सुवर्ण व रौप्य
कायरा बिसेन – कांस्य व सुवर्ण

या यशामागे खेळाडूंची अथक मेहनत, जिद्द आणि नियमित सरावाबरोबर प्रशिक्षक दिपा गवळे व गणेश सावते यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्या प्रशिक्षणाखाली खेळाडूंनी उत्कृष्ट तांत्रिक कौशल्य व आत्मविश्वासपूर्ण खेळाचे प्रदर्शन केले.

सर्व पदक विजेत्या खेळाडूंचे किक बॉक्सिंग महाराष्ट्रचे अध्यक्ष मा. निलेश शेलार तसेच सचिव धीरज वाघमारे तसेच नांदेड जिल्हा किक बॉक्सिंग असोसिएशन चे सचिव किरण गवळे यांनी अभिनंदन करून आगामी राष्ट्रीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.
ब्लेज कॉम्बॅट अँड फिटनेस क्लबच्या खेळाडूंनी पुन्हा एकदा आपल्या मेहनत, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर राज्यस्तरावर आपला दबदबा सिद्ध करत नांदेड जिल्ह्याचे नाव अभिमानाने उंचावले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थी हिताला प्राधान्य: एमएच-सीईटीमुळे हुकलेल्या परीक्षा पुन्हा घेणार

Chief Editor

दिल्लीचे उद्योग,अन्न व नागरी पुरवठा,वने मंत्री सरदार मनजींदर सिघ सिरसा यांचे नांदेड विमानतळ येथे आगमन व स्वागत

Chief Editor

माँसाहेब जिजाऊ म्हणजे चालतं बोलतं संस्कार विद्यापीठ -डॉ. सुरेखा भोसले

Chief Editor

महामानव लोकशाहीर, साहित्यरत्न, डॉ.अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्त नांदेडमध्ये विविध कार्यक्रमांचे आयोजन

Chief Editor

आक्षेपार्ह सोशल मीडिया पोस्टविरोधात पत्रकारांची कंधार पोलीस ठाण्यात तक्रार

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

Leave a Comment