एम सी आर

मुक्त विद्यापीठाच्या रोजगार मेळाव्यात शेकडो युवकांना नोकरीची संधी (३५ नामांकित कंपन्यांचा सहभाग — पात्र उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्रे)

Uncategorized

नांदेड, दि. २७ : यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, विभागीय केंद्र नांदेड व युवाशक्ती फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्यात शेकडो बेरोजगार युवक-युवतींना महाराष्ट्रातील नामांकित तसेच आंतरराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्या.

या मेळाव्यासाठी सुमारे १३०० विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली होती. पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, अमरावती, रांजणगाव आदी औद्योगिक शहरांतील सुमारे ३५ प्रतिष्ठित कंपन्यांनी सहभाग नोंदवला. मुलाखतीत पात्र ठरलेल्या अनेक उमेदवारांना कंपन्यांकडून तात्काळ नियुक्तीपत्रेही देण्यात आली.

कार्यक्रमास विद्यापीठाच्या ग्रामीण विकास व उद्योजकता विद्याशाखेचे संचालक प्रा. कैलास मोरे, युवाशक्ती फाउंडेशनचे संचालक डॉ. सतीश पवार, झोनल मॅनेजर आनंद मिरगे, नांदेड विभागीय केंद्राचे वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. यशवंत कलेपवार तसेच छत्रपती संभाजीनगर येथील वरिष्ठ शैक्षणिक सल्लागार डॉ. नंदकुमार राठी आदी मान्यवर उपस्थित होते.

मुक्त विद्यापीठाच्या वतीने राज्यभरात आतापर्यंत एकूण ११ रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून सुमारे २३ हजार विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. त्यापैकी सुमारे १२०० बेरोजगार युवकांना विविध कंपन्यांमध्ये रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याची माहिती आयोजकांनी दिली. पुढील काळातही राज्यभर टप्प्याटप्प्याने रोजगारविषयक कार्यशाळा व मेळावे आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.

मेळावा यशस्वी करण्यासाठी विभागीय केंद्रातील दिलीप थोरात, डॉ. दिग्विजय देशमुख, विकास पावडे, नितेश देशमाने, राजू खरपडे, सुरज गायकवाड, माधव वैद्य, अक्षय गिरे, मुंजाजी कदम, गजानन कोकाटे, शिवानंद गिरे, भावेश देशमुख आदींनी परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. गजानन इंगोले यांनी केले, तर आभार प्रदर्शन राजू खरपडे यांनी मानले.

Share

Related posts

नांदेडमध्ये घरफोडी प्रकरणाचा छडा तीन आरोपी अटकेत • रोख रक्कम जप्त

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात १९ जून रोजी ‘राष्ट्रीय वाचन दिन’ आणि विद्वत व्याख्यानाचे आयोजन

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठ कार्यक्षेत्राचा राज्यस्तरावर गौरव विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. ज्ञानेश्वर दादाजी पवार यांची शिक्षक संवर्गातून निवड

Chief Editor

नांदेड महापौर चषक स्पर्धांचे आयोजन व क्रीडा शिष्यवृत्ती योजनेसाठी महापौरांना निवेदन

Chief Editor

नाथ संप्रदायातील एक सहज संत: ह भ प श्री गहिनीनाथ महाराज औसेकर*

Chief Editor

डॉ.पंजाबराव देशमुख बहुआयामी व्यक्तिमत्व या विषयावर व्याख्यान संपन्न

Chief Editor

Leave a Comment