एम सी आर

यशवंत ‘ मध्ये फॅशन डिझायनिंग करिअर कोर्सचे उद्घाटन संपन्न

Uncategorized

*’
नांदेड:( दि. ७ ऑक्टोबर २०२६)
यशवंत महाविद्यालयात फॅशन डिझायनिंग करियर ओरिएंटेड कोर्सचे उद्घाटन उत्साहात संपन्न झाले.
उद्घाटन सोहळ्याचे अध्यक्षस्थान माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे यांनी भूषविले. प्रमुख अतिथी शैली ब्युटी पार्लर आणि फॅशन डिझायनिंग, नांदेडच्या संचालिका उषा उत्तमराव पाटील होत्या.
सोहळ्याचे प्रास्ताविक फॅशन डिझायनिंग करिअर ओरिएंटेड कोर्सच्या समन्वयिका डॉ.एस.एम.दुर्राणी यांनी केले. प्रास्ताविकात त्यांनी, फॅशन डिझायनिंग हा कोर्स विद्यार्थिनींच्या करिअरमध्ये महत्त्वपूर्ण असल्याचे विशद केले तसेच या कोर्सच्या समाप्तीनंतर महाविद्यालयाकडून प्रमाणपत्र प्रदान केले जाईल व विद्यार्थिनी फॅशन डिझाइनिंग प्रारंभ करून चांगले उत्पन्न प्राप्त करू शकतात. आधुनिक काळात प्रत्येक कार्यक्रम व इव्हेंटमध्ये फॅशन डिझाइनिंगला पर्याय नाही, हेही नमूद केले.
प्रमुख अतिथी उषा पाटील यांनी, फॅशन डिझायनिंगचे महत्व विद्यार्थिनींना विस्तृत मार्गदर्शनाद्वारे स्पष्ट केले. फॅशन डिझायनिंग मधून मुलींना करिअरच्या अनेक संधी उपलब्ध होतात, याचीही माहिती दिली.
अध्यक्षीय समारोप राज्यशास्त्र विभागातील डॉ. कविता सोनकांबळे यांनी केला. कार्यक्रमास लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांची आवर्जून उपस्थिती होती.
सोहळ्याच्या यशस्वीतेसाठी संदीप पाटील, डॉ.अजय गव्हाणे, गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, प्रशांत मुंगल, नाना शिंदे यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमास कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेतील विद्यार्थिनींची उपस्थिती होती.

Share

Related posts

रियाद सेनन यांना डॉ. किशोर इंगळे यांच्या मार्गदर्शना खाली संख्याशास्त्र विषयात पीएच.डी. पदवी प्रदान

Chief Editor

उपवर्गीकरणासाठी मातंग समाजाचे आंदोलन; नोकरभरती स्थगितीची मागणी

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठामध्ये ‘आयरिन्स व इन्फ्लिबनेट सेवा’ राष्ट्रीय कार्यशाळा

Chief Editor

यशवंत ‘मधील एनसीसी कॅडेट्सचे खडतर प्रशिक्षण यशस्वी

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा: सुभाष ढगे

Chief Editor

लोकशाही मूल्य रुजविण्यासाठी युवा संसद महत्त्वाची ठरते : श्रीमती चंद्रकला रावळकर

Chief Editor

Leave a Comment