एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘मधील एनसीसी कॅडेट्सचे खडतर प्रशिक्षण यशस्वी

नांदेड (दि. ६ मे २०२६)
यशवंत महाविद्यालयातील एनसीसी कॅडेट्सनी शिबिरामध्ये फायरिंग, ड्रिल, आणि सांस्कृतिक कार्यक्रमांमध्ये विविध पारितोषिक प्राप्त झाली, ही कौतुकास्पद बाब आहे. तितकेच नव्हे तर एनसीसी मधील अनेक कॅडेट्सनी भारतीय सेनेत विविध पदे प्राप्त करून रोजगार देखील मिळविला आहे,असे प्रतिपादन माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांनी केले.
बिलोली तालुक्यातील गोदावरी मनार विद्यालयातील यशवंत महाविद्यालयातील प्रशिक्षित यशस्वितांच्या सत्कार सोहळ्यात ते बोलत होते.
सदरील कम्बाईन वार्षिक प्रशिक्षण शिबिर २१० मध्ये नांदेड आणि हिंगोली येथील विविध महाविद्यालय आणि शाळेमधील एकूण ४५० कॅडेट्सने सहभाग घेतला होता. महाविद्यालयातील एनसीसी कक्षाचे संचालक लेफ्टनंट प्रा. श्रीकांत सोमठाणकर यांनी कॅम्प डेप्युटी कमांडंट म्हणून आपली जबाबदारी पार पाडली. तसेच महाविद्यालयातील सीनियर अंडर ऑफिसर रणवीर ठाकूर या कॅडेटने कॅम्प सीनियर म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका पार पाडली. कॅम्प मध्ये बेस्ट कॅडेट म्हणूनही पारितोषिक मिळविले. जेयूओ बापूराव नवरखेले या कॅडेटने जवळपास सर्वच स्पर्धेत आपला सहभाग नोंदवून मेडल्स मिळविले.
यशस्वी कॅडेट्सचे डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, प्रा.ओमप्रकाश गुंजकर, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, अभय थेटे आदींनी अभिनंदन केले आहे.

Share

Related posts

नांदेडमध्ये भरदिवसा खून; इंदिरानगर परिसरात खळबळ

Chief Editor

मांडवी पोलिसांची मोठी कारवाई पिंपळगाव फाटा शिवारात जुगार व मटका हद्द्यावर धाड दहा जनावर गुन्हा दाखल एक लाखाचा मुद्देमाल जप्त

Chief Editor

नेताजी सुभाषचंद्र बोस महाविद्यालयात इंग्रजी विभागातर्फे व्याख्यान संपन्न

Chief Editor

मंत्रालयातील कथित कर्मचाऱ्यांचा आगळा-वेगळा प्रताप..! शासकीय नोकरीत असूनही पदाचा गैरवापर करून मानसिक त्रास; डॉ. निलेश बास्टेवाड यांचे पत्रकार परिषदेत गंभीर आरोप

Chief Editor

अण्णा भाऊ साठे आणि शंकर भाऊ साठे यांचा समृद्ध वारसा पुढे चालू ठेवणारे खंबीर नेतृत्व : सचिन भाऊ साठे..

Chief Editor

पदवी प्रथम वर्ष प्रवेशाची अंतिम मुदत २० ऑगस्टपर्यंत वाढविली

Chief Editor

Leave a Comment