एम सी आर
Uncategorized

बोली भाषा सामान्य जनांची सहज, सुंदर अभिव्यक्ती: डॉ.पृथ्वीराज तौर.

परभणी:

भिंतीत बसवलेला आरसा स्त्री साठी कपाळावर मेन लावून कुंकु लावण्यापुरता सीमीत होता. बदलत्या काळानुसार आज आरसा पूर्ण रुपगुण दर्शन घडवत स्त्री ला अभिव्यक्तीच स्वातंत्र्य बहाल करत आहे. सामान्य माणूस आपल्या मायबोलीतून आत्मोन्नती सह आपले पणाची जाणिव वाढीस लावत नितळ पाण्याच्या प्रवाहा सारखं लोकजीवनात आपले आचरण घडवत असल्याचे समाधान मराठी भाषा सल्लागार समीतीचे सदस्य, स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड मराठी विभाग प्रमुख डॉ पृथ्वीराज तौर यांनी व्यक्त केले.
मराठी विभाग महाराष्ट्र राज्य. भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य.मराठी विभाग स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड आणि कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित परभणी जिल्ह्यातील बोलींचा जागर कार्यक्रमात प्रमुख अतिथी तथा मार्गदर्शक डॉ. पृथ्वीराज तौर बोलत होते.
कार्यक्रमाचे उदघाटक हेमंतराव जामकर अध्यक्ष, नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था , परभणी. प्रमुख अतिथी म्हणून भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य,भारत जाधव ,पर्यवेक्षक. समाधान महाजन ,अधिक्षक. राहुल सुर्यवंशी, अनुवादक यांची उपस्थिती लाभली.
अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे.प्रमुख मार्गदर्शक
मुलतानी बोली भाषेच्या अभ्यासक प्रा.
स्वाती काटे विभाग प्रमुख, समाजशास्त्र विभाग,पिपल्स कॉलेज , नांदेड. विश्वकोश निर्मिती मंडळाचे सदस्य प्रा.डॉ.सुरेश कदम राजर्षी शाहू महाविद्यालय, परभणी.हभप.सौ.मीराताई सुपेकर सद्गुरू बालासाहेब पौळ महाराज भजनी मंडळ ,परभणी. आदींची उपस्थिती होती.
मराठी भाषा संवर्धन पंधरवड्या निमित्त बोलींचा जागर कार्यक्रमाची सुरुवात कै.सौ.कमलताई जामकर यांच्या प्रतिमेचे पुजन आणि दिपप्रज्वलन उदघाटक हेमंतराव जामकर यांचे हस्ते करण्यात आले.तसेच प्रसंगी मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.शोभायात्रा ग्रंथदिंडी काढण्यात आली यात सद्गुरू बालासाहेब पौळ महाराज भजनी मंडळ परभणी आणि महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींचे विशेष योगदान लाभले.वाटसरु , रिक्षावाले,फळवाले , विविध दुकान वाले विशेषतः हिंदु – मुस्लिम बांधवांनी शोभायात्रेत सहभागी होत मराठी भाषेची अस्मिता आपलेपण सिद्ध केले.
ग्रंथ दिंडीत बोली वाचवा, बोली जगवा, बोली टिकवा , संस्कृती टिकवा , मराठी भाषेचा विजय असो , मराठी असे आमुची मायबोली, ज्ञानोबा माऊली तुकाराम , आम्ही मराठी , बोलतो मराठी आदी फलक विद्यार्थीनींनी झळकवत घोषणा दिल्या.आनंदी आणि उत्साही वातावरणात ग्रंथदिंडीचे लोकांनी स्वागत करत बोलींचा जागर केला. या वेळी प्रा. अनिल बडगुजर ,समाधान महाजन ,सौ.मीराताई सौ.संगिता गरड आदींनी फुगडी खेळली. भजनी मंडळातील महिला , प्राध्यापक महिलांसह विद्यार्थिनींनी पावली खेळत या कार्यक्रमाची रंगत वाढवली.
मुलतानी बोली ची महती.तिची पार्श्वभूमी. लोक जीवनातील तिचे महत्त्व.मुलतानी माती सह मुलतानी शब्द बोलीच्या उत्पत्ती विषयी आणि आजच्या लोकजीवनातील तिचे महत्त्व डॉ.स्वाती काटे यांनी पटवून दिले.
कैकाडी बोली भाषा,कैकाडी समाजातील आचार विचार ,रुढी प्रथा परंपरासह कैकाडी बोली चे वेगळे लक्ष्मण माने यांच्या उपऱ्या आत्मकथना धारे पण आपल्या अभ्यासपूर्ण शैलीत डॉ.सुरेश कदम यांनी महत्त्व विशद केले.
मराठी भाषा विभाग भाषा संचालनालय महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त मुलींचा जागर या उपक्रमा आधारे लोक जीवनातील लोक बोलीचे महत्व अधोरेखित करत बोलीचे वेगळेपण जपणारा सामान्य माणूस जपला पाहिजे हा हेतू या कार्यक्रमाच्या मागचा असल्याचा विश्वास भारत जाधव यांनी व्यक्त केला.
प्रसंगी महाराष्ट्र गीत ,लोकगीत ,धनगरी गीत ,तुमडी गीत,गोंधळ ,भारुड, गवळण डॉ.रविंद्र इंगळे ,डॉ पल्लवी कुलकर्णी, लोकजीवनातील सर्व प्रकारचे लोकवाद्यवृंद माऊली पाथरकर आणि संचाने सादर केली.शाहीर डॉ. शिवराज शिंदे यांनी अमर शेख यांनी रचलेला क्रांतिसिंह नाना पाटील यांचा पोवाडा सादर करत श्रोत्यांची मने जिंकली.
महाराष्ट्र गीताने कार्यक्रमाचे सुरुवात तर राष्ट्रगीताने शेवट करण्यात आला.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ रामचंद्र भिसे यांचे मार्गदर्शनाखाली बोलींचा जागर कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.अरुण पडघन , डॉ आशा गीरी यांचे सह डॉ.रविंद्र इंगळे , डॉ. पल्लवी कुलकर्णी, डॉ.अभिजित सरनाईक सर्व प्राध्यापक , कर्मचारी , विद्यार्थीनी यांचे योगदान लाभले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.डॉ. आशा गिरी यांनी केले तर आभार प्रा.अरुण पडघन यांनी मानले.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये कालवश राधाबाई पिराजी वाघमारे यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Chief Editor

यशवंत ‘मधील एनसीसी कॅडेट्सचे खडतर प्रशिक्षण यशस्वी

Chief Editor

एआय सीसीटीव्हीच्या निगराणीत यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा

Chief Editor

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

Chief Editor

बहुजनांचे सुराज्य बनविणारे – छत्रपती शिवाजी महाराज

Chief Editor

तरुणाई स्वतःचा शोध युवक महोत्सवातून घेतात -माजी राज्यमंत्री श्री.डी.पी.सावंत

Chief Editor

Leave a Comment