एम सी आर
Uncategorized

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

नव्वद वाचकांनी नव्वद मिनिटे अनुभवला डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास!

बिब्लियोफाइल्स विथ डॉ.आंबेडकर उपक्रमाला वाचकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

नांदेड :

‘पुस्तकांवर मनस्वी प्रेम’ ही डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची एक ठळक ओळख.या ओळखीचा वारसा जतन करण्याचा प्रयत्न म्हणून ‘बिब्लियोफाइल्स विथ भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ असा एक अनोखा उपक्रम यशवंत महाविद्यालयाने आयोजित केलेला…या उपक्रमात नव्वद वाचक सहभागी झाले आणि त्यांनी बाबासाहेबांशी निगडीत पुस्तकांचे तब्बल नव्वद मिनिटे वाचन करुन त्यांचा प्रसन्न असा ‘अक्षर सहवास’ अनुभवला.

बुद्ध आणि त्यांचा धम्म,प्राॅब्लम ऑफ रुपी,शूद्र पूर्वी कोण होते?,मुक्ती कोण पथे?,जातिव्येवस्थेचे निर्मूलन,थॉट्स ऑन पाकिस्तान, वेटिंग फॉर व्हिसा या डॉ. बाबासाहेब आंबेडकर लिखित पुस्तकांबरोबर पार्ट-अपार्ट, लोकशाहीतला माणूस,जग बदलणारा बाप माणूस,परिसस्पर्श,गांधी- आंबेडकर, भारतीय दलित आंदोलन, भूमिपुत्रांचे बाबासाहेब,बोल महामानवांचे यासोबतच भारतीय संविधान अशा अनेकानेक पुस्तकांच्या वाचनातून बाबासाहेबांच्या पाऊलखुणांचा वेध वाचकांनी घेतला.

प्राचार्य डॉ.गणेशचंद्र शिंदे यांचे प्रोत्साहन आणि उपक्रमशील अध्यापक डॉ.विश्वाधार देशमुख यांच्या संकल्पना-संयोजनातून आयोजित या उपक्रमात उपविभागीय अधिकारी डॉ.सचिन खल्लाळ,डॉ.विजय भोसले, डॉ.सूर्यप्रकाश जाधव,डॉ.महेश जोशी, डॉ.माधव पुयेड, प्रा.अमित शिंदे, प्रा.रविकांत कांबळे,कुलदीप नंदूरकर, प्रा.भारती सुवर्णकार,प्रा.अंकिता भोसले,अभंग पुस्तकालयाचे अथर्व कस्तुरे अशा नांदेडमधील मान्यवर वाचकांसह डॉ.बालाजी चिरडे (वर्धा), डॉ.ज्ञानदेव राऊत (लातूर), केशव वाघमारे (पुणे),अभिलाष महामुने (पुणे),रवी केसकर (धाराशीव), प्रसेनजित भद्रे (मुंबई), प्रा.अविनाश गायकवाड (कोल्हापूर), डॉ.गुलाब शेख (परभणी), प्रा.रत्नाकर मुंगल (अहमदपूर) यांच्यासह महाविद्यालयातील सत्तर आजी-माजी विद्यार्थ्यांनी प्रस्तुत उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवून नव्वद मिनिटांच्या ‘सलग वाचनाच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अक्षर सहवास’ अनुभवला.

यशवंत बिब्लियोफाइल्सच्या या अनोख्या उपक्रमाला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून पुस्तकांकडे आणि त्यातही वैचारिक वाचनाकडे तरुण पिढीचा कल वाढत असल्याचे दिसून आले आहे.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

महिलांचे राजकारणातील कर्तृत्व वाखाणण्यासारखे -डॉ.लक्ष्मी पूरणशेट्टीवार

Chief Editor

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा : सुभाष ढगे

Chief Editor

*प्रा.गुंजकर यांचे सामुद्रिक जलतरणातील सुयश स्तुत्य -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

लोकप्रशासनाच्या क्षेत्रात संशोधन, प्रशिक्षण व प्रशासकीय सुधारणेला नवी दिशा

Chief Editor

Leave a Comment