एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये स्वा.रा.ती.म. विद्यापीठ उन्हाळी परीक्षा सुरळीत

नांदेड:( दि.२९ एप्रिल २०२६)
यशवंत महाविद्यालयात स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, उन्हाळी: २०२६ परीक्षा सुरळीत संपन्न होत आहेत. माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार परीक्षा केंद्रप्रमुख डॉ. दिगंबर भोसले, सहाय्यक केंद्रप्रमुख डॉ.सचिन पाटील आणि सहकेंद्रप्रमुख एम.पी. कॉलेज, पालम, जि.परभणी येथील डॉ.जी.ए. कऱ्हाळे आणि सोनपेठ येथील रसायनशास्त्र विभागप्रमुख डॉ.संदीपकुमार देवराये परिश्रम घेत आहेत.
महाविद्यालयाने अंतर्गत भरारी पथकाची स्थापना केली असून सकाळच्या सत्राकरिता डॉ.एम.एम.व्ही. बेग, डॉ. संतोष मोरे, डॉ.शिवदास शिंदे, डॉ.शबाना दुर्राणी, प्रा.प्रियंका सिसोदिया, प्रा.राजश्री भोपाळे, श्रीमती ए.बी.शिंगेवाड, दुपारच्या सत्राकरिता डॉ.राजकुमार सोनवणे, डॉ. बालाजी भोसले, डॉ.अर्चना गिरडे, प्रा.भारती सुवर्णकार, श्रीमती के.पी.सावळे यांनी यशस्वी सहकार्य केले आहे.
परीक्षेच्या कार्याकरिता राजू अडबलवार, दीपक शिवनगे, गणेश शिंदे, डी.जे.पिटलेवाड, पी.एल.ईबितवार, आर. सी. बासीगमलू, व्हि.पी.इंगोले, संतोष धात्रक, शंकर मिरेवाड, विठ्ठल सुरनर, एन. बी.शिंदे, एजाज शेख हे शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहे.
सकाळ सत्रातील तपासणी पथकातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यात ओम आळणे, समृत तिडके, डी.आर. टरके, के.टी. तेलंग, जगदीश उमरीकर, सौ. पी. ए. काकडे, श्रीमती एम.आर.कुकुटला, श्रीमती जे.आर.मांजरमकर आणि दुपार सत्राकरिता एम.आर.बत्तलवाड, के. एस.इंगोले, एस. आर. आलुरवाड, डी.एस.साखरे, एम.एन. इतबारे, श्रीमती के.पी.सावळे, श्रीमती ए.बी. शिंगेवाड, सौ.एस.एस.भालके यांचा समावेश आहे.
महाविद्यालयाच्या अर्जानुसार शिवाजीनगर पोलीस स्टेशन येथील माननीय पोलीस निरीक्षकांनी परीक्षेदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये; याकरिता यथोचित पोलीस बंदोबस्ताची देखील व्यवस्था केलेली आहे.
तसेच उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ.हरिश्चंद्र पतंगे, प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे यांचे देखील सहकार्य लाभले आहे.

Share

Related posts

जिजाऊंच्या संस्काराचा वसा आणि वारसा आजच्या मुलींनी घ्यावा: सुभाष ढगे

Chief Editor

यशवंत ‘ मधील एनसीसी कॅडेट्सची राष्ट्रीय शिबिरासाठी निवड

Chief Editor

*प्रा.गुंजकर यांचे सामुद्रिक जलतरणातील सुयश स्तुत्य -प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन.शिंदे

Chief Editor

विज्ञान आणि आरोग्य यांच्या समन्वयामुळे समाज सुदृढ बनू शकतो – डॉ. नितीन जोशी यांचे प्रतिपादन

Chief Editor

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहात साजरा

Chief Editor

Leave a Comment