नांदेड प्रतिनिधी: दि. 26 सप्टेंबर 2026 : बजाज फायनान्स लिमिटेडच्या वतीने Mini Samvaad 2026 – Final for Customer Excellence या विशेष कार्यक्रमाचे आयोजन नांदेड येथील हॉटेल लॉर्ड्स स्कायलाइट येथे करण्यात आले. ग्राहक सेवा, भागीदारी, वित्तीय सेवा, AI आणि नवकल्पना यावर या कार्यक्रमात विचारविनिमय करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी RSM श्री. परागजी पाटील सर आणि ASM श्री. नितेशकुमार फाळके जी यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान बजाज फायनान्ससोबत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या डीलर्सचा विशेष सन्मान करून पुरस्कार प्रदान करण्यात आले.डीलर्सच्या योगदानाबद्दल त्यांचे कौतुक करण्यात आले तसेच भविष्यातील व्यवसायवृद्धी आणि ग्राहक सेवेसाठी एकत्रितपणे काम करण्याचा संदेश देण्यात आला.
यावेळी बजाज फायनान्सच्या National Head (CD – North & West) श्री. Tanveer Khan आणि Zonal Manager (CD – North & West) श्री. Parag Oak यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राहककेंद्री सेवा आणि व्यवसायवृद्धीवर भर देण्यात आला. या कार्यक्रमाचे नियोजन SM श्री. प्रशांतजी पाटील, SM श्री. राहुलजी शिंदे, SM श्री. अताउल्लाह खान आणि SM श्री. प्रकाश इंगोले यांनी केले.
“Connect. Simplify. Scale.” या संकल्पनेतून ग्राहकांना अधिक चांगला अनुभव देण्याचा आणि डीलर्ससोबतची भागीदारी अधिक मजबूत करण्याचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.
