एम सी आर

विद्यार्थ्यांच्या कौशल्यविकासासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण : डॉ. अशोक महाजन

Uncategorized

नांदेड, दि. २३ सप्टेंबर २०२६ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP-2020) अंतर्गत पदवी तृतीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसाठी On-the-Job Training (OJT) व Internship ची प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या उद्देशाने ‘Effective Implementation of On-the-Job Training (OJT) & Internship under NEP-2020’ या विषयावर एकदिवसीय जिल्हास्तरीय कार्यशाळा यशवंत महाविद्यालय, नांदेड येथील ई-लर्निंग सेंटरमध्ये उत्साहात संपन्न झाली. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेस 76 सहभागी उपस्थित होते. विद्यापीठाच्या Innovation, Incubation & Linkages Centre चे संचालक डॉ. शैलेश वाधेर यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना केली.

विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी मार्गदर्शन करताना OJT व Internship ची उद्दिष्टे, विद्यापीठाची अंमलबजावणी योजना तसेच विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यक्षेत्राचा अनुभव देण्याचे महत्त्व स्पष्ट केले. सैद्धांतिक ज्ञान आणि प्रत्यक्ष कामाचा अनुभव यांच्यातील दरी कमी करण्यासाठी OJT व Internship महत्त्वपूर्ण असल्याचे त्यांनी नमूद केले. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये, संवादकौशल्य, संघभावना, समस्या सोडविण्याची क्षमता तसेच रोजगारक्षमता विकसित होण्यास मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड आणि यशवंत महाविद्यालय नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यशाळेस 76 सहभागी उपस्थित होते.
वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखेचे प्रभारी अधिष्ठाता तथा नांदेड जिल्हा समन्वय युनिटचे समन्वयक डॉ. एच. एस. पतंगे यांनी OJT व Internship च्या प्रत्यक्ष अंमलबजावणीबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. नांदेड जिल्ह्यातील विविध आस्थापना, शासकीय कार्यालये आणि कार्यक्षेत्रांची माहिती देताना विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध असलेल्या संभाव्य संधींची माहिती त्यांनी दिली.

या कार्यशाळेस विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. एस. एम. जोगदंड, डॉ. प्रशांत पेशकर व डॉ. हनमंत कंधारकर उपस्थित होते. अध्यक्षीय मार्गदर्शन करताना यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी OJT व Internship च्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व संबंधित संस्थांनी समन्वयाने कार्य करण्याची गरज व्यक्त केली. उपलब्ध स्थानिक संसाधने, संस्थात्मक सुविधा आणि विविध आस्थापनांशी असलेले संबंध यांचा विद्यार्थ्यांच्या हितासाठी प्रभावी वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

कार्यशाळेचे आभार प्रदर्शन डॉ. एम. डी. आंबोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन प्रा. भारती सुवर्णकर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रा. पद्माराणी राव, प्रा. परम चिकटे, प्रा. माधव दुधाटे, प्रा. अजय गव्हाणे, महाविद्यालयाचे प्रबंधक श्री. संदीप पाटील आदींनी परिश्रम घेतले.

Share

Related posts

स्वारातीम विद्यापीठात ४ सप्टेंबर रोजी ‘संभाषण कौशल्य व व्यक्तिमत्त्व विकास’ कार्यशाळेचे आयोजन

Chief Editor

विज्ञान-तंत्रज्ञानाच्या सांगडीतूनच ऊर्जा स्त्रोतांची पुनर्निर्मिती शक्य – प्रो. री-ची मुराकामी

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठाच्या बहिस्थ शिक्षण विभागाची सहविचार सभा उत्साहात संपन्न

Chief Editor

स्वातंत्र्यदिनाच्या औचित्याने विद्यापीठात ‘पीएच.डी. एंड-टू-एंड’ सॉफ्टवेअर पोर्टलचा शुभारंभ

Chief Editor

राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष.

Chief Editor

सहस्रकुंड धबधबा विकासासाठी ४३ कोटींचा आराखडा; मुख्यमंत्र्यांच्या उपसचिवांची पाहणी

Chief Editor

Leave a Comment