अर्धापूर/प्रतिनिधी :
अर्धापूर तालुक्यातील लोणी (खु.) येथे कालवश दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध सामाजिक, धार्मिक व प्रबोधनात्मक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी भावपूर्ण अभिवादन केले. सामाजिक बांधिलकी जपत आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिर,धम्मदेसना,सामूहिक भोजनदान आणि समाजप्रबोधनाच्या कार्यक्रमाला ग्रामस्थ व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
पुण्यस्मरण दिनाच्या निमित्ताने नांदेड जिल्हा अभिवक्ता संघाचे अध्यक्ष ॲड. श्री. यदुपत शामसुंदरराव देशमुख अर्धापूरकर यांचा नागरी सत्कार करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती.
सकाळच्या सत्रात पूजापाठ व धम्मदेसनेचे आयोजन करण्यात आले. त्यानंतर रक्तदान शिबिर घेण्यात आले. सामाजिक बांधिलकी जपत अनेक नागरिकांनी रक्तदान करून या उपक्रमात सहभाग नोंदविला. सामूहिक भोजनदानाचाही उपक्रम घेण्यात आला. यावेळी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय देशमुख लहानकर, अर्धापूर नगरपंचायतीचे सदस्य सोनाजी सरोदे तसेच उपसरपंच गौतम लोणे यांची उपस्थिती होती.
सायंकाळनंतर रात्री नऊ वाजता मयुरी खाडे व त्यांच्या संचाच्या वतीने समाजप्रबोधनाचा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, समता, बंधुभाव आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देण्यात आला. विविध उपक्रमांच्या माध्यमातून दिवंगत दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या सामाजिक कार्याला उजाळा देण्यात आला.
कार्यक्रमास रामसिंग मठवाले, जिल्हा अभियंता संघ सदस्य, भाजपा तालुकाध्यक्ष बालाजी पाटील गव्हाणे, राजेश्वर शेटे, हदगाव पंचायत समिती सदस्य आनंदराव भंडारे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष लक्ष्मीकांत मुळे, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रामराव भालेराव, भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष सचिन कल्याणकर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष नागोराव भांगे पाटील, सुनील पाटील लोहकरे, अर्धापूर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष गुणवंत विरकर, सरपंच रमेश पाटील क्षीरसागर आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुदास लोणे यांनी केले. प्रास्ताविक राजेश लोणे यांनी केले, तर उपस्थितांचे आभार सरपंच अनुसयाबाई लोणे यांनी मानले.
यावेळी उपसरपंच संभाजी रामजी लोणे, भास्कर वैद्य, शामराव लोणी गुरुजी, दीपक लोणे, सौ. प्रजापती लोणे, विजय लोणे, सुदास लोणे, भुजंगराव लोणे, प्रसेनजित लोणे, ग्रामसेवक दत्तराव थोरात, ॲड. गौरव सरोदे, उमेशभाऊ सरोदे, ॲड. राजरत्न शितळे, केरबा (बंडू) पिंपळपल्ले, पंढरीनाथ क्षीरसागर, जोगदंड माऊली, शिवाजी सोनटक्के, साहेबराव लोखंडे, माजी सरपंच शंकर ढगे यांच्यासह ग्रामस्थ व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दलितमित्र निवृत्तीराव लोणे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या विविध सामाजिक व प्रबोधनात्मक उपक्रमांमुळे त्यांच्या सामाजिक कार्याच्या स्मृतींना उजाळा मिळाला. सामाजिक बांधिलकी, समता आणि बंधुभावाचा संदेश देत हा पुण्यस्मरण सोहळा भावपूर्ण वातावरणात संपन्न झाला.
