एम सी आर

कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल वार्षिकांक विमोचन

Uncategorized

परभणी:

दिनांक 20 ऑगस्ट 2026 रोजी, कै.‌सौ.‌ कमलताई जामकर महिला महाविद्यालयातील वाड्मय मंडळाच्या वतीने कमल हा वार्षिकांक काव्यविशेषांक या शीर्षकाखाली काढण्यात आला, मराठी, हिंदी ,इंग्रजी, आणि उर्दू या चार भाषेतील या अंकासाठी विद्यार्थिनींनी प्रसिद्ध कवींच्या मुलाखती घेतल्या त्याचबरोबर कविता आणि लेख लिहिले एकूण८० विद्यार्थिनींनी या सृजनशील लेखनामध्ये
सहभाग घेतला.या अंकाचे विमोचन मा.
हेमंतरावजी जामकर (अध्यक्ष नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी )यांच्या वाढदिवसानिमित्त मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले . याप्रसंगी व्यासपीठावर उपस्थित मा. हेमंतरावजी जामकर (अध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी ), मा‌ .अँड किरणरावजी सुभेदार (उपाध्यक्ष नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी ),
मा. डॉ. अभयजी सुभेदार(कोषाध्यक्ष, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी), मा.विजयरावजी जामकर(सचिव, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी),
मा. अँड .मंगेशरावजी सुभेदार(संचालक, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी), मा. गोविंदरावजी नांदापूरकर(संचालक, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी), मा.सौ.दीपाताई जामकर(संचालक, नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था परभणी), मा.सोनियाताई जामकर,मा. हर्षलभैय्या सुभेदार,मा. शंतनूभैय्या सुभेदार,तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रामचंद भिसे आणि वाड्मय मंडळातील प्राध्यापक डॉ.आशा गिरी, डॉ.ओमप्रभा लोहकरे,डॉ.संगीता लोमटे, डॉ.नसीम बेगम उपस्थित होते त्याचबरोबर विद्यार्थिनी संपादक मंडळातील वैष्णवी देशमुख ,नेहा रेंगे (मराठी विभाग), भाग्यश्री रामप्रसाद रनेर,शेख बुशरा शेख आयुब (हिंदी विभाग), सुमेरा बेगम, प्रतीक्षा मोरे (इंग्रजी विभाग), तरणुंम बानो, अल्मास फातेमा (उर्दू विभाग) या विद्यार्थिनी उपस्थित होत्या ..कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आशा गिरी यांनी केले तर आभार शिंदे.जी.एन यांनी मानले.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील मुलांच्या वस्तीगृहात इंडक्शन प्रोग्राम संपन्न

Chief Editor

महात्मा फुले यांचे क्रांतिकारकत्व:-डॉ.अजय गव्हाणे

Chief Editor

तांत्रिक कौशल्य ही काळाची गरज – डॉ. सचिन नरंगले

Chief Editor

क्रीडा स्पर्धा म्हणजे नव्या प्रतिभांना संधी मिळवून देणारे व्यासपीठ – श्री भैरवनाथ नायकवाडी

Chief Editor

निरोगी जीवनशैलीसाठी मूलभूत आरोग्य टिप्स:आरोग्य सल्लागार- मीरा धूळगुंडे

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात भगवान सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींचा अवतार दिन उत्साहात साजरा

Chief Editor

Leave a Comment