एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मधील मुलांच्या वस्तीगृहात इंडक्शन प्रोग्राम संपन्न

नांदेड:(दि. १८ सप्टेंबर २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील मुलांच्या वस्तीगृहात शैक्षणिक वर्ष: २०२६-२७ इंडक्शन प्रोग्राम संपन्न झाला.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा संस्थेचे अध्यक्ष खा.अशोकरावजी चव्हाण, माजी राज्यमंत्री व संस्थेचे सचिव श्री.डी.पी.सावंत, सर्व पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य तसेच माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ.गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या कल्पकतेतून यशवंत महाविद्यालयाने बॉईज होस्टेलसाठी अतिशय सुंदर नवीन इमारती निर्माण केलेली आहे. मुलांसाठी अतिशय चांगली राहण्याची सोय, जेवणासाठी उत्तम कॅन्टीन, अभ्यासासाठी प्रत्येक मजल्यावर अभ्यास कक्ष, गरम पाण्यासाठी सोलर हिटर, पिण्याच्या पाण्यासाठी आरो सिस्टीम, उत्तम सुरक्षा व्यवस्था इ. सोयी सुविधायुक्त होस्टेलमध्ये २१५ विद्यार्थ्यांना राहण्याची सोय करण्यात आलेली आहे.
शैक्षणिक संकुल परिसरामध्ये निवासी विद्यार्थ्यांसाठी सत्रारंभ सोहळा प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या मार्गदर्शनानुसार घेण्यात आला.
कार्यक्रमास होस्टेलचे समन्वयक डॉ. संभाजी वर्ताळे, प्रमुख अतिथी डॉ.प्रशांत उबाळे, पालक प्रतिनिधी प्रा.पवणे, सहसमन्वयक प्रा. नारायण गव्हाणे व वॉर्डन भुजंग चव्हाण व्यासपीठावर उपस्थित होते.
प्रारंभी भारताचे माजी गृहमंत्री श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या प्रतिमेस अभिवादन केले.
डॉ.प्रशांत उबाळे यांनी मार्गदर्शनातून श्रद्धेय डॉ. शंकररावजी चव्हाण यांच्या कार्याचा इतिहास विद्यार्थ्यांसमोर ठेवला. प्रा. पवणे यांनी, विद्यार्थ्यांनी हॉस्टेलमधील असलेल्या चांगल्या व्यवस्थेचा फायदा घेऊन आई-वडिलांच्या स्वप्नांची पूर्तता करावी, असा सल्ला दिला. प्रा. नारायण गव्हाणे यांनी विद्यार्थ्यांनी आपल्या अडचणी वेळोवेळी सांगण्यासाठी सूचना केल्या. डॉ. संभाजी वर्ताळे यांनी अध्यक्षीय समारोपात विद्यार्थ्यांना अभ्यासाबद्दलचे सखोल मार्गदर्शन केले.
सूत्रसंचालन भुजंग चव्हाण यांनी केले तसेच आभार देखील मानले.
उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रसिद्धी समन्वयक डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक गजानन पाटील यांनी सहकार्य केले. कार्यक्रमास विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Share

Related posts

यशवंत ‘ मध्ये रसायनशास्त्र विभागात ‘क्युरी क्लब’चे थाटात उद्घाटन

Chief Editor

यशवंत युवक महोत्सवात पोस्टर सादरीकरण उत्साहात संपन्न

Chief Editor

पर्यावरण रक्षणासाठी जनजागृती आवश्यक – डॉ. गीता लाठकर

Chief Editor

यशवंत ‘द्वारे शोधचक्र पोर्टलवर राष्ट्रीय कार्यशाळा उत्साहात संपन्न

Chief Editor

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील तरुणींना वैमानिक होण्यासाठी “गिविंग विंग्स टू फ्लाई “उपक्रम.

Chief Editor

स्वारातीम’ विद्यापीठात तीन कर्मचाऱ्यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा संपन्न

Chief Editor

Leave a Comment