एम सी आर

यशवंत युवक महोत्सवात मॉडेल सादरीकरण स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

Uncategorized

नांदेड:( दि.२७ फेब्रुवारी २०१६)
यशवंत महाविद्यालयात यशवंत वार्षिक युवक महोत्सव:२०२६ अंतर्गत मॉडेल सादरीकरण स्पर्धा माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांच्या संकल्पनेनुसार आणि डॉ.नीरज पांडे यांच्या समन्वयातून दि.२६ फेब्रुवारी रोजी विद्यार्थ्यांच्या गुणवत्तापूर्ण प्रतिसादाने संपन्न झाली.
‘विकसित भारत २०४७: युवकांची भूमिका’ या आव्हानात्मक विषयावर एकूण २४ स्पर्धकांनी विविध उपविषयावर मॉडेल प्रकल्प सादर केले. या स्पर्धेचे समन्वयक डॉ.वनदेव बोरकर होते. स्पर्धेचे परीक्षक नेताजी सुभाष चंद्र बोस महाविद्यालयातील डॉ.मनीष देशपांडे आणि इंदिरा गांधी वरिष्ठ महाविद्यालय, सिडको येथील डॉ.निलेश इंगळे होते. स्पर्धेचे सूत्रसंचालन डॉ. मदन अंभोरे यांनी केले
स्पर्धा समिती सदस्य डॉ. ज्ञानेश्वर पुपलवाड, प्रा.साहेब माने, डॉ. राजरत्न सोनटक्के, डॉ.योगेश नकाते, डॉ.मदन अंभोरे, डॉ.संदीप राठोड तसेच शिक्षकेतर कर्मचारी पी.एल.बेळीकर, डी. एस.अंगरोड, आणि जी.के. लिंगायत यांनी परिश्रम घेतले. याप्रसंगी भौतिकशास्त्र विभागप्रमुख डॉ.प्रवीणकुमार मिरकुटे यांची उपस्थिती होती.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे, डॉ. हरिश्चंद्र पतंगे, डॉ.अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, जगन्नाथ महामुने आदींनी सहकार्य केले.

Share

Related posts

स्वारातीम’ विद्यापीठात मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त १०० वृक्षांचे रोपण

Chief Editor

मराठी रोजगाराभिमुख भाषा -पत्रकार व कथाकार राम तरटे

Chief Editor

वारी पर्यावरणाची उपक्रमातून अध्यात्म संतवाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Chief Editor

कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांना ‘ग्लोबल ग्रीन लीडरशिप अवॉर्ड’ शाश्वत विकास व पर्यावरण संवर्धनातील नेतृत्वाचा गौरव; विद्यापीठ परिवारात आनंदाचे वातावरण

Chief Editor

यशवंत महाविद्यालयात अभिरुची फिल्म क्लबच्या वतीने ‘दिठी’ चित्रपटाचा आस्वाद

Chief Editor

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Chief Editor

Leave a Comment