एम सी आर

सावित्रीबाई नंतर आजहीअनेक महिला उन्नती पासून वंचित आहेत’ :डॉ. राजेंद्र गोणारकर

Uncategorized

नांदेड:
आज आपण इतकी वर्ष झाले सावित्रीबाई फुले जयंती साजरी करतो, परंतु महिलाच्या स्थितीमध्ये अपेक्षित प्रमाणात बदल झालेला नाही,” असे विधान डॉ. राजेंद्र गोणारकर (माध्यमशास्त्र संकुल, स्वा. रा. ती. म. विद्यापीठ, नांदेड) यांनी कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय, परभणी येथे ‘ सावित्री-जिजाऊ सप्ताह’ याचे उद्घाटन व सावित्रीबाई फुले यांच्या जयंती उत्सवामध्ये विद्यार्थिनी व प्राध्यापक वृंद यांना मार्गदर्शन करताना केले. पुढे ते असेही म्हणाले की, “AI च्या आजच्या जमान्यातही भारतीय समाजातील स्त्रियांकडे पाहण्याचा परंपराग दृष्टिकोन, तिला दिली जाणारी दुय्यमतेची वागणूक, स्त्री-पुरुष भेद यात कोणताही बदल झालेला नाही. या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्थेच्या संचालक मा. सौ. दीपलक्ष्मीताई जामकर या होती. यावेळी सावित्री व जिजाऊ यांच्या जीवनपटावर आधारीत भितीपत्रकांचे विमोचन मान्यवरांचे हस्ते करण्यात आले.तर विशेष उपस्थिती प्राचार्य डॉ. रामचंद्र भिसे यांची होती मनोगत व्यक्त करांताना मुलीसाठी कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविघालय सुरु करून साविञीबाई फुले चा विचार व कार्य पुढे नेले असे विचार मांडले. यावेळी राजमाता जिजाऊ स्त्री अभ्यास केंद्राच्या समन्वयक डॉ. संगीता लोमटे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले, तर सूत्रसंचालन व पाहुण्यांचा परिचय प्रा. परमेश्वर यादव यांनी केला. डॉ.नसीम बेगम यांनी आभार व्यक्त केले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थिनी व सर्व विभागातील प्राध्यापक वृंद यांचे सहकार्य व उपस्थिती लाभली.

Share

Related posts

यशवंत ‘ मधील रामेश्वर जाधव यांना अर्थशास्त्रात पीएच.डी. प्रदान

Chief Editor

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Chief Editor

युवक हा राष्ट्र क्रांति घडवून आणणारा बलवान हत्यार:मा.श्री.नारायण चौधरी”

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालया मध्ये शिवणकाम व ब्यूटीपार्लर कार्यशाळे चा उद्घाटन कार्यक्रम संपन्न झाला

Chief Editor

यशवंत ‘मधील डॉ.मीरा फड यांची आयआयपीएच्या स्वीकृत सदस्यपदी नियुक्ती

Chief Editor

मराठवाड्यात विकासाची मोठी सुप्तशक्ती” – ज्येष्ठ विचारवंत माधव भंडारी

Chief Editor

Leave a Comment