एम सी आर

सीबीसीएस पॅटर्नच्या पदव्युत्तर विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अंतिम परीक्षेची संधी

Uncategorized

स्वारातीम विद्यापीठाकडून विद्यार्थी व महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक सूचना जाहीर

नांदेड :   स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या पदव्युत्तर स्तरावरील अभ्यासक्रमांना शैक्षणिक वर्ष २०२३–२४ पासून राष्ट्रीय शिक्षण धोरण (एनईपी) २०२० नुसार नवीन अभ्यासक्रम पद्धत लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यापूर्वी सीबीसीएस पॅटर्नअंतर्गत शिकणाऱ्या जुन्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
शैक्षणिक वर्ष २०१९–२० (प्रथम वर्ष) आणि २०२०–२१ (द्वितीय वर्ष) अंतर्गत एम.ए., एम.कॉम., एम.एस्सी., एम.सी.ए. तसेच सर्व एम.व्होक अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना तीन परीक्षा संधी पूर्ण झाल्यानंतरही एक किंवा अधिक विषयांत अनुत्तीर्ण
राहिलेल्या विद्यार्थ्यांना उन्हाळी २०२६ मध्ये अतिरिक्त व अंतिम परीक्षा संधी देण्यात येणार आहे.
या संदर्भात विद्यापीठाशी संलग्न सर्व महाविद्यालयांचे प्राचार्य, न्यू मॉडेल डिग्री कॉलेज हिंगोली, लातूर व परभणी उपपरिसर, कै. उत्तमराव राठोड आदिवासी विकास व संशोधन केंद्र (किनवट) तसेच विद्यापीठ परिसरातील सर्व संकुलांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयामार्फत २० फेब्रुवारी २०२६ पर्यंत नियमित शुल्कासह परीक्षा आवेदन पत्र सादर करावे. तसेच २१ फेब्रुवारी २०२६ रोजी धनाकर्ष (डीडी) काढण्यात यावा किंवा एनईएफटी/आरटीजीएस करावे आणि सर्व परीक्षा आवेदन पत्रे २३ फेब्रुवारी २०२६ रोजी विद्यापीठात सादर करावीत.
परीक्षा आवेदन पत्रे ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आवश्यक लिंक उपलब्ध करून देण्याबाबत स्वतंत्र परिपत्रक प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक हुशारसिंग साबळे यांनी दिली आहे.
———————————————-

Share

Related posts

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Chief Editor

प्रतिक्षा बिरादार हिची विद्यार्थी कल्याण मंडळाच्या सचिव पदी निवड

Chief Editor

प्राचार्य डॉ.शेखर घुंगरवार यांना भगिनीशोक आशाताई कांबळे यांचे अल्पशा आजाराने निधन;

Chief Editor

बौद्ध समाजातील महिलांविषयी कथित आक्षेपार्ह वक्तव्य; लक्ष्मण ढोबळेंसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी

Chief Editor

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेचा लाभ मिळण्यासाठी शेतकऱ्यांनी ॲग्रीस्टॅक नोंदणी व आधार प्रमाणीकरण तातडीने पूर्ण करावे – सहाय्यक निबंधक अशोक राठोड यांचे आवाहन

Chief Editor

स्वा. रा. ती. म. विद्यापीठाचा संघ राष्ट्रीय युवक महोत्सवासाठी रवाना

Chief Editor

Leave a Comment