एम सी आर

यशवंत ‘ मधील डॉ.मीरा फड यांची राज्यस्तरीय निवड

Uncategorized

नांदेड:(दि.९ फेब्रुवारी २०२६)
श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील लोकप्रशासन विभागप्रमुख डॉ. मीरा फड यांची महाराष्ट्र राज्यशास्त्र आणि लोकप्रशासन परिषदेच्या चंद्रपूर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात संपन्न झालेल्या आंतरविद्याशाखीय राष्ट्रीय परिषदेत कार्यकारिणी सदस्यपदी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ परिक्षेत्रातून २०२६ ते २०२९ या कालावधीकरिता निवड झाली आहे.
या निवडीबद्दल माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे यांनी डॉ.मीरा फड यांचा यथोचित सत्कार केला आणि भविष्यातील शैक्षणिक आणि संशोधकीय कार्यासाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.
या सत्कारसमयी उपप्राचार्य डॉ. कविता सोनकांबळे, राज्यशास्त्र विभागप्रमुख डॉ. अजय गव्हाणे, लेफ्टनंट डॉ. रामराज गावंडे, डॉ.विरभद्र स्वामी यांची उपस्थिती होती.
उपप्राचार्य डॉ. हरिश्चंद्र पतंगे, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाच्या समन्वयिका डॉ. एल.व्ही.पदमाराणी राव, डॉ. साहेब शिंदे, प्रा.माधव दुधाटे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील, अभय थेटे, जगन्नाथ महामुने, नाना शिंदे आदींनी शुभेच्छा दिल्या आहेत.

Share

Related posts

२३ ते २८ फेब्रुवारी दरम्यान यशवंत वार्षिक युवक महोत्सवाचा जागर आणि जल्लोष

Chief Editor

वारी पर्यावरणाची उपक्रमातून अध्यात्म संतवाणी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

Chief Editor

नांदेड महानगरपालिका निवडणूक 2026 : प्रभाग क्र. 10 (अ) मधून ॲड. ज्ञानेश्वर धडके यांचा सर्वांगीण विकासाचा निर्धार

Chief Editor

BH सिरीज वाहनधारकांनी थकीत कर तातडीने भरावा; अन्यथा विशेष तपासणी मोहिमेत कारवाई. प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे आवाहन

Chief Editor

कै. सौ. कमलताई जामकर महिला महाविद्यालयात लेखन प्रेरणा दिन साजरा

Chief Editor

Leave a Comment