एम सी आर
Uncategorized

यशवंत ‘ मध्ये दि.३१ जानेवारी रोजी पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन

नांदेड:( दि.३० जानेवारी २०२६)

श्री.शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालयातील पालक शिक्षक समितीच्या वतीने दि. ३१ जानेवारी, शनिवार रोजी दुपारी ठीक ४ वाजता ई-लर्निंग लॅब, इंग्रजी विभागामध्ये पालक शिक्षक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या मेळाव्याचे अध्यक्षस्थान स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी प्र-कुलगुरू प्राचार्य डॉ. गणेशचंद्र एन. शिंदे भूषविणार आहेत.

प्रमुख अतिथी संस्थेचे सहसचिव माजी प्राचार्य डॉ.रावसाहेब शेंदारकर आणि कार्यकारीणी सदस्य श्री.पांडुरंगराव पावडे आहेत. यावेळी उपप्राचार्य डॉ.कविता सोनकांबळे आणि डॉ.हरिश्चंद्र पतंगे यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.


तरी यशवंत महाविद्यालयात शिक्षण घेत असलेल्या पाल्यांच्या पालकांनी या पालक शिक्षक मेळाव्यास उपस्थित राहावे, असे आवाहन समिती समन्वयक डॉ. शिवराज शिरसाठ, डॉ. मीरा फड, डॉ.धनराज भुरे, डॉ. दिगंबर भोसले, डॉ.रमेश चिल्लावार, प्रा. भारती सुवर्णकार, प्रा.परम चिकटे, डॉ. सोनाली वाकोडे, प्रा. नारायण गव्हाणे, प्रसिद्धी समन्वयक डॉ. अजय गव्हाणे, प्रबंधक संदीप पाटील, अधीक्षक कालिदास बिरादार व गजानन पाटील यांनी केले आहे.

Share

Related posts

मितभाषी, संयमी व भाषिक अहिंसामय: डॉ.अशोक सिद्धेवाड (लेखक:डॉ. अजय गव्हाणे)

Chief Editor

स्वारातीम विद्यापीठात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जयंती उत्साहात साजरी

Chief Editor

अडचणी कितीही मोठ्या असल्या तरी आत्महत्या हा पर्याय नाही; मदत मागा, आयुष्याला नवी दिशा द्या

Chief Editor

बेरोजगार तरुणांसाठी २७ मार्च रोजी रोजगार मेळावा; २००० पेक्षा अधिक रिक्त पदांची संधी; डॉ. यशवंत कलेपवार

Chief Editor

महादेव पिंपळगाव येथे अति आवश्यक संच वितरण कॅम्पमध्ये गोंधळ; बांधकाम कामगारांची गैरसोय

Chief Editor

यशवंत ‘ मध्ये डॉ. रंगनाथन जयंती व ‘राष्ट्रीय ग्रंथपाल दिन’ उत्साहात संपन्न

Chief Editor

Leave a Comment